सरकारमधील तिघांच्या वादामुळे मराठा आरक्षणाचं मातेरं झालं, चंद्रकांतदादा भडकले

सरकारमधील तिघांच्या वादामुळे मराठा आरक्षणाचं मातेरं झालं, चंद्रकांतदादा भडकले

मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी जर मान्य केलं तर या आंदोलनाचे नेतृत्त्व भाजप करेल.

  • Share this:

कोल्हापूर, 25 नोव्हेंबर: मराठा समाजावर (Maratha Community) महाविकास आघाडी सरकारनं (Mahavikas Aaghadi Government) अन्याय केला आहे. 9 सप्टेंबरपासून आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) कोणतीही भूमिका सरकारनं घेतली नाही. शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तिघांमधील वादामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचं मातेरं झालं, असा घणाघाती आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil)यांनी केला आहे.

SEBC प्रवर्गाच्या बाबतीत देखील मराठा समाजाची निराशा केली. अलौकीक पद्धतीने राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देणं गरजेचं होतं, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा...विठुमाऊलीची सेवा करणाऱ्या या दामप्त्याला मिळाला कार्तिकीच्या महापूजेचा मान

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारनं मराठा समाजाला गृहीत धरलं आहे. त्यामुळे आता मराठा समाजात मोठा आक्रोश निर्माण होईल. मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी जर मान्य केलं तर या आंदोलनाचे नेतृत्त्व भाजप करेल. राज्य सरकारला आम्ही सळो की पळो करून सोडू, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिला. मराठा समाजानं आंदोलन केले तरच भाजप नेतृत्त्व करणार, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

अजित पवारांचा भाजपला टोला

महाविकास आघाडी सरकार पुढील दोन महिन्यात कोसळणार' असं भाकीतच भाजपचे (BJP) नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)यांनी वर्तवलं होतं पण 'कार्यकर्ते बरोबर राहण्यासाठी, आमदारांमध्ये चलबिचल न होण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी सारखी गाजरं दाखवावी लागतात' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सणसणीत टोला लगावला.

'कोणतेही सरकार सत्तेत आले की, त्यांच्या विरोधात असलेल्या विरोधी पक्षाला वारंवार काही तरी विधानं करावी लागतात. कार्यकर्ते बरोबर राहण्यासाठी, आमदारांमध्ये चलबिचल न होण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी सारखी गाजरं दाखवावी लागतात.त्यामुळे भाजप नेते सारखे सरकार पडण्याची भाषा करत आहे' असा सणसणीत टोला पवारांनी भाजपला लगावला.

'आता महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष झाले आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. त्यांचे आशिर्वाद आहे, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही' असंही पवारांनी स्पष्ट केले.

'चंद्रकांत पाटील यांनी कुणी सांगितले आहे, आम्ही स्वप्न पाहत आहोत. आम्ही स्वप्न पाहत नाही तर थेट कृती करण्याचे काम करतो. त्यांना कधी कळलं आम्हाला स्वप्न पडली. मुळात 105 आमदार असताना सरकार बनवता आलं नाही. हे त्याचं खरं दुखणं आहे, म्हणून सारख्या काट्या पेटवतात' असा टोलाही अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

हेही वाचा..राज ठाकरेही हळहळले, अहमद पटेलांचा सत्तेच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच!

'राज्यात कोरोनाचे संकट आले, निसर्ग चक्रीवादळ आले, परतीच्या पावसाचे संकट आले अशी अनेक संकट आली, या संकटातून मार्ग काढत सरकार पुढे चालले आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे सर्वांना माहिती आहे, सरकार व्यवस्थिती पद्धतीने काम करत आहे' असंही अजितदादांनी सांगितले.

'मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार काम करत आहे. प्रवेशाबाबत लवकरच जीआर काढला जाणार आहे, दोन दिवसात निर्णय घेतला जाईल' अशी माहितीही पवारांनी दिली.

Published by: Sandip Parolekar
First published: November 25, 2020, 2:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या