Home /News /maharashtra /

बात 'हरामखोरीची' निघाली तर...'सामना'तील अग्रलेखावरून आशिष शेलारांचा पलटवार

बात 'हरामखोरीची' निघाली तर...'सामना'तील अग्रलेखावरून आशिष शेलारांचा पलटवार

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना असं वादंग पेटलं आहे. दुसरीकडे, भाजपनं कंगनाची बाजू घेतल्यानंतर शिवसेनेनं भाजपवर विखारी टीका केली आहे.

  मुंबई, 9 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना असं वादंग पेटलं आहे. दुसरीकडे, भाजपनं कंगनाची बाजू घेतल्यानंतर शिवसेनेनं भाजपवर विखारी टीका केली आहे. 'राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे ही सुद्धा 'हरामखोरीच' म्हणजे मातीशी बेईमानीच आहे.' असा शब्दात शिवसेनेनं भाजपवर सडकून टीका केली आहे. मात्र, आता शिवसेनेच्या टीकेला भाजप नेता आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. हेही वाचा...कंगनाच्या मुंबईतील ऑफिसवर पालिकेचा हातोडा, तळ मजल्यावर तोडकाम सुरू बात 'हरामखोरीची' निघाली तर मग 'डांबरानं' लिहिलं जाईल, असं मुंबईकरांना बरेच आठवेल!, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी शिवसेनावर पलटवार केला आहे. 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय? असा सवालही ट्विटरच्या माध्यमातून आशिष शेलारांनी यावेळी विचारला. आणखी काय म्हणाले आशिष शेलार? बेईमानी नेमकी कोण करतेय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पाहा! मुंबई साखळी बॉम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, ऑफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का? पण रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरात आणि कंगना रणौतच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना? या जुन्या गोष्टीची आठवण करून देत आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोलाही लगावला आहे. फडणवीसांवर शिवसेनेची खोचक टीका... पावसाळी अधिवेशनात भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत आणि कंगना रानावत प्रकरणावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. या टीकेला आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. 'शिवसेनेने वेगळी वाट निवडली असली तरी ‘पंतप्रधान’ म्हणून मोदींचा अवमान कदापि सहन करणार नाही. मोदी हे आज एक व्यक्ती नसून पंतप्रधान म्हणून ‘संस्था’ आहे. महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहात आहेत, त्यांना 106 हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच, पण राज्याची 11 कोटी जनताही माफ करणार नाही. ‘मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे! या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये' अशा शब्दात शिवसेनेनं फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 'मुंबईत इमानाने राहणाऱ्या सर्वांची आहे. मुंबईची तुलना ‘पाकव्याप्त’ कश्मीरशी करणे व मुंबई पोलिसांना माफिया वगैरे हिणवून खाकी वर्दीचा अवमान करणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. महाराष्ट्रातील 11 कोटी मऱ्हाटी जनतेस तर हा असा मुंबईचा अवमान म्हणजे देशद्रोहासारखा गुन्हा वाटतो, पण असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या मागे राष्ट्रभक्त मोदी सरकारचे गृहमंत्रालय सुरक्षा कवच घेऊन ठामपणे उभे राहते तेव्हा आपले 106 हुतात्मेही स्वर्गात अश्रू ढाळत असतील' असं परखड मत सेनेनं व्यक्त केले. हेही वाचा......ही सुद्धा ‘हरामखोरीच आणि मातीशी बेइमानीच’, शिवसेनेची भाजपवर विखारी टीका 'भारतीय जनता पक्ष मुंबईचा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचाअवमान करणाऱ्यांना सरळ पाठिंबा देत आहे. हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा, धर्माचा आणि 106 हुतात्म्यांच्या त्यागाचाच अवमान केला व असा अवमान करून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रावर नशेच्या पिचकाऱ्या टाकणाऱ्या व्यक्तीला केंद्र सरकार विशेष सुरक्षेच्या पालखीचा मान देत आहे. मुंबईला आधी बदनाम करायचे, नंतर खिळखिळे करायचे. मुंबईस संपूर्ण कंगाल करून एक दिवस ती महाराष्ट्रापासून तोडायची या कारस्थानाची पावले नव्याने पडू लागली आहेत हे आता स्पष्ट दिसत आहे' असा आरोपही शिवसेनेनं थेट भाजपवर केला आहे. 'अहमदाबाद, गुरगाव, लखनौ, वाराणसी, रांची, हैदराबाद, बंगळुरू, भोपाळ अशा शहरांबद्दल अवमानजनक विधान एखाद्याने केले असते तर केंद्राने ‘वाय सुरक्षे’ची पालखी त्या व्यक्तीस दिली असती काय, हे महाराष्ट्रातील भाजपच्या मंडळींनी स्पष्ट करावे', असा सवालही सेनेनं विचारला आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Sandip Parolekar
  First published:

  Tags: Kangana ranaut, Mumbai police, Saamana editorial, Sanjay raut, Shiv sena, Udhav thackeray

  पुढील बातम्या