मुंबई, 09 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut)च्या मुंबईतील ऑफिसवर मुंबई महापालिकेकडून तोडक कारवाईची सुरुवात झाली आहे. कंगना आता मुंबई पालिकेच्या रडारवर आहे. कंगनाच्या मुंबईतील वांद्रे याठिकाणी असणाऱ्या कार्यालयामधील तळमजल्यावर पालिकेच्या तोडकामास सुरुवात झाली आहे. पालिकेची टीम कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर दाखल झाली आहे. याठिकाणी असलेल्या कार्यालयामध्ये बेकायदेशीर बदल झाल्याचा आरोप पालिकेकडून करण्यात आला होता. बेकायदेशील बदलांसाठी पालिकेने मंगळवारी नोटीस देखील बजावली होती. नोटीशीला 24 तास उलटल्यावनंतर पालिकेकडून तोडक कारवाई होत आहे. म्हणजेच याठिकाणी जे कोणते अनधिकृत बांधकाम आहे, त्याच्यावर पालिकेचा हातोडा पडत आहे.
दरम्यान मुंबई महापालिकेच्या या कारवाईस सुरूवात झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्वीट केले आहे. तिने तिच्या लेटेस्टे ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'मी कधी चुकीची नव्हते आणि माझे शत्रू हे वारंवार सिद्ध करत आहेत की मुंबई आता PoK झाली आहे.'
I am never wrong and my enemies prove again and again this is why my Mumbai is POK now #deathofdemocracy 🙂 pic.twitter.com/bWHyEtz7Qy
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
हे ट्वीट करताना तिने #deathofdemocracy असा हॅशटॅग वापरत तिच्या ऑफिसमध्ये सुरू असलेल्या तोडफोडीचा एक फोटो पोस्ट केला आहे. कंगनाने याठिकाणी बीएमसीकडून कारवाई केली जाईल अशी शंका आज याआधी केलेल्या ट्वीटमधून व्यक्त केली होती. तिच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या मंदिराचे फोटो तिने शेअर केले होते.
मणिकर्णिका फ़िल्म्ज़ में पहली फ़िल्म अयोध्या की घोषणा हुई, यह मेरे लिए एक इमारत नहीं राम मंदिर ही है, आज वहाँ बाबर आया है, आज इतिहास फिर खुद को दोहराएगा राम मंदिर फिर टूटेगा मगर याद रख बाबर यह मंदिर फिर बनेगा यह मंदिर फिर बनेगा, जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम 🙏 pic.twitter.com/KvY9T0Nkvi
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
दरम्यान अभिनेत्री कंगना रणौत चंदीगड विमानतळावर पोहोचली असून ती काही काळातच मुंबईसाठी रवाना होणार आहे. मात्र बीएमसीच्या या धडक कारवाईनंतर मुंबईतील इतर अनधिकृत बांधकामांवर देखील अशीच तातडीने कारवाई होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.