परळी, 08 जुलै : बीड जिल्ह्यातील परळी शहरातील एसबीआय बँकेच्या 8 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने परळीकरांची चिंता वाढली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेले दोन कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी पार्टीत गेले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोघांपैकी एकाने सात-आठ दिवसांखाली शहरातील एका ऑफिसमध्ये तर दुसऱ्याने एका गुत्तेदार नेत्याच्या शेतात त्याच्या वाढदिवसाच्या मेजवानी घेतल्याचे समोर आले आहे. दरम्यान आरोग्य विभागाने परळी शहर आणि परिसरातील 2000 पेक्षा जास्त लोकांना क्वारंटाइन केले आहे. क्वारंटाइन सेंटरमधून रुग्णांना घरी सोडण्याचं काम करतोय ‘हा’ कोरोना योद्धा शहरातील एसबीआयच्या शाखेतील तब्बल आठ कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे परळी शहरात संचारबंदी लावण्यात आली तर आसपासच्या दत्तक असलेल्या पंधरा गावात कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला. पॉझिटिव्ह आलेल्या दोन कर्मचाऱ्यांपैकी दोन जण वेगवेगळ्या पार्टीत हजर होते. यातील एक पार्टी एका खासगी कार्यालयात झाली. जिथे दहा ते बारा जण हजर होते. यामध्ये एका कॉलेजच्या प्राचार्यासह शहरातील प्रतिष्ठित व्यापारी होते. ‘आशिर्वाद असू द्या पाठीशी’, देवेंद्र फडणवीसांचे ‘अभिमन्यु’ मुलासह कोरोनाबाधित! तर दुसरी पार्टी एका गुत्तेदार नेत्याच्या शेतात त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झाली. या पार्टीला मोठ्या प्रमाणात लोकं हजर होते. यामध्ये नेते, कार्यकर्ते, अधिकारी, दिग्गज व्यापारी यांनी हजेरी लावल्याची माहिती मिळाली आहे. आरोग्य विभागाने या सर्वांची माहिती घेण्यास सुरुवात केली असून बँकेशी संबंधित 2000 पेक्षा जास्त लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







