Home /News /maharashtra /

संचारबंदीत माजी खासदारांच्या गाडीतून फिरणाऱ्या दोघांवर पोलिसांकडून काठ्यांचा प्रसाद

संचारबंदीत माजी खासदारांच्या गाडीतून फिरणाऱ्या दोघांवर पोलिसांकडून काठ्यांचा प्रसाद

भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या कारमधून फिरणाऱ्या दोघांना अहमदनगर पोलिसांनी चांगलाच काठ्यांचा प्रसाद दिला आहे.

अहमदनगर, 3 एप्रिल: भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या कारमधून फिरणाऱ्या दोघांना अहमदनगर पोलिसांनी चांगलाच काठ्यांचा प्रसाद दिला आहे. एवढेच नाही तर त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे. संचारबंदीच्या काळात 'माजी खासदार' असं नंबर प्लेटवर लिहिलेल्या कारमधून फिरणाऱ्या दोघांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं. एवढंच नाही तर त्यांना यथेच्छ काठ्यांचा प्रसाद दिला. हेही वाचा..BREAKING: संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या भाजप आमदाराविरुद्ध बीडमध्ये गुन्हा दाखल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे स्वतः शहरातील धरती चौकात रस्त्यावर उतरत कर्फ्युत विनाकारण फिरणाऱ्या नादान नागरिकांवर कारवाई करत होते. वाहनचालक अत्यावश्यक सेवेत नसल्याचे लक्षात येताच एकीकडे पोलिस काठ्यांचा प्रसाद देत होते. गाडीची हवा सोडण्याबरोबर कायदेशीर कारवाई पण करत होते. अशात एमएच 16-बीपी 2121 असा नंबर असलेली माजी खासदार दिलीप गांधी यांची आलिशान चारचाकी वाहन जिल्हाधिकाऱ्यांनी अडवले. कारच्या नंबर प्लेटवर कमळाच्या चिन्हासह माजी खासदार असे लिहिलेले होते. मात्र, गांधी या गाडीत स्वतः नव्हते. जंतूनाशकाची फवारणी करण्यासाठी गेले असल्याचे या गाडीत असलेल्या रोशन विजयकुमार गांधी आणि कपिल पंढरीनाथ माने यांनी सांगितले. हेही वाचा..LockDown! प्रेमासाठी Coronaची कहाणी रचली आणि कामवाली अडचणीत आली पोलिसांनी या दोघांना यथेच्छ काठ्यांचा प्रसाद दिला. तसेच वाहनातील या दोघांवर कलम 188 प्रमाणे कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची आणि माझी बदनामी होईल या उद्देशाने केल्याचा आरोप दिलीप गांधी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे, याबाबत आपण माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी स्वतः मोठा पोलीस फौजफाटा सोबत घेऊन कसलेही सोशल डिस्टनसिंग न पाळता फिरत आहेत. मात्र, मी पक्षाच्या आदेशाने सामाजिक बांधिलकीतून मोफत अन्न, औषध फवारणी यासाठी काम करत असताना प्रशासनाने जाणीवपूर्वक माझ्या स्वीयसहायक आणि ड्रायव्हरवर मारहाण करत कारवाई केल्याचे दिलीप गांधी यांनी म्हटले आहे.. हेही वाचा..मुंबई एअरपोर्टवर कर्तव्य बजावणाऱ्या 11 जवानांना 'कोरोना', CISF कॉलनी केली सील आज जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईतून मोटारसायकलला दुधाचे कॅन लावलेले शेतकरी सुद्धा सुटले नाहीत. अशा दुचाकीस्वारांना पण काठीचा मार पडला. जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा 17 वर पोहोचला असला तरी अनेक नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरत असल्याने जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आता कठोर भूमिका घेतली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: BJP

पुढील बातम्या