Home /News /national /

LockDown! प्रेमासाठी Coronaची कहाणी रचली आणि कामवाली अडचणीत आली

LockDown! प्रेमासाठी Coronaची कहाणी रचली आणि कामवाली अडचणीत आली

तिने लोकांना सांगितलं की, कोरोनासारखी लक्षणं असल्यानं जिथं काम करत होती त्यांनी कामावरून काढून टाकलं. पण ज्यावेळी पोलिसांनी तपास केला तेव्हा धक्कादायक गोष्ट समोर आली.

    कोलकाता, 03 एप्रिल : सध्या कोरोनामुळे देशात लॉकडाउन आहे. या लॉकडाउनच्या काळात लोकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. असे असतानाही पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगना जिल्ह्यात घरांमध्ये काम करणाऱ्या कामवाली महिला रस्त्यावर फिरताना सापडली. जेव्हा स्थानिक लोकांनी तिची चौकशी केली तेव्हा वेगळीच माहिती सांगितली. तिनं लोकांना सांगितलं की, कोरोनासारखी लक्षणं असल्यानं जिथं काम करत होती त्यांनी कामावरून काढून टाकलं. पण ज्यावेळी पोलिसांनी तपास केला तेव्हा धक्कादायक गोष्ट समोर आली. महिलेनं सुरुवातीला केलेला दावा आणि पोलिसांनी सांगितलेली माहिती वेगळीच आहे. रविंद्र सरोवर परिसरातील पोलिसांच्या माहितीनुसार महिलेनं स्वत:च काम सोडलं होतं. महिलेनं सांगितलं होतं की, तिची तब्येत ठीक नाही आणि कोरोनासारखी लक्षणं दिसत होती. मात्र खरंतर तिला एका व्यक्तीला भेटायचं होतं आणि त्यासाठी तिनं कहाणी रचल्याचं स्पष्ट झालं. पोलीस अधिकाऱ्याने याची माहिती दिली. संबंधित महिलेनं स्वत:हून कामावर जाणं बंद केलं होतं. आमच्याकडे फोन आला तेव्हा तिचा शोध घेतला. त्यानंतर तिची टेस्टही करण्यात आली. डॉक्टरांनी तिला कोरोना नसल्याचं स्पष्ट केलं. तिच्या एकूण वागण्यावरून ती मित्राला भेटण्यासाठी गेली असावी. लोकांनी विचारताच तिने कोरोनाची कहाणी सांगितली असावी. हे वाचा : मोदींच्या ‘त्या’ घोषणेनंतर ऊर्जा मंत्रालय हादरलं, वीज पुरवढाच होऊ शकतो ठप्प लोकांनी जेव्हा महिलेला फिरताना पाहिलं तेव्हा तिला याचं कारण विचारलं. त्यानंतर तिची माहिती लोकांनी पोलीस आणि केएमसी ला दिली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आणि तपासणी झाल्यावर महिलेला त्याच लोकांनी रहायची व्यवस्था केली आहे. तिच्या खाण्या-पिण्याची आणि राहण्याची व्यवस्था कऱण्यात आल्याची माहिती दिली आहे. हे वाचा : सावध राहा! भारताला एप्रिल अखेरी आहे खरा धोका; तज्ज्ञांचा इशारा
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या