जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BREAKING: संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या भाजप आमदाराविरुद्ध बीडमध्ये गुन्हा दाखल

BREAKING: संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या भाजप आमदाराविरुद्ध बीडमध्ये गुन्हा दाखल

BREAKING: संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या भाजप आमदाराविरुद्ध बीडमध्ये गुन्हा दाखल

संचारबंदीत एखाद्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल होण्याची ही राज्यात पहिलीच घटना आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे भाजप कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे .

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 3 एप्रिल: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू संपूर्ण देशासह राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच आमदार सुरेश धस हे बीड जिल्ह्याच्या सीमा ओलांडून त्यांच्या मदतीसाठी भिगवण (जि.पुणे) येथे गेले होते. यावरुन आमदार धस यांच्यावर संचारबंदीचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. एखाद्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल होण्याची ही राज्यात पहिलीच घटना आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे भाजप कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे . हेही वाचा… राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झाली 490; मुंबईत सर्वाधिक रुग्ण वाढले काय आहे प्रकरण? भिगवण येथे बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच आमदार सुरेश धस हे जिल्ह्याच्या सीमा ओलांडून त्यांच्या मदतीसाठी गेले होते. दरम्यान, संचारबंदीच्या काळात जिल्हा बंदीचे आदेश आहेत. त्यामुळे आमदार सुरेश धस यांनी संचार बंदीचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात कलम 188, 269, 270, 51 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा… सावध राहा! भारताला एप्रिल अखेरी आहे खरा धोका; तज्ज्ञांचा इशारा दुसरीकडे राज्यात कोरोनाबाधित 88 नव्या रुग्णांची नोंद झाला आहे. एकूण रुग्ण संख्या 490 वर पोहोचली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे,. त्यातील 54 रुग्ण मुंबई येथील असून 9 जण अहमदनगरचे ,11 पुणे येथील आहेत. याशिवाय 9 जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. 2 रुग्ण औरंगाबादचे तर प्रत्येकी 1 रुग्ण सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचा आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 490 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. धक्कादायक म्हणजे शुक्रवारी राज्यात 4 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात