• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • पंढरपूरकरांकडून राष्ट्रवादीचा 'करेक्ट कार्यक्रम', भाजप विजयाचा उंबरठ्यावर!

पंढरपूरकरांकडून राष्ट्रवादीचा 'करेक्ट कार्यक्रम', भाजप विजयाचा उंबरठ्यावर!

अखेर फडणवीसांच्या आवाहनाला पंढरपूरकारांनी हाक देत राष्ट्रवादीला आस्मान दाखवले आहे.

  • Share this:
पंढरपूर, 02 मे: अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur Assembly by-election 2021) पंढरपूरकरांनी राष्ट्रवादीचा 'करेक्ट कार्यक्रम' केला आहे.अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत 26 व्या फेरीअखेरीस भाजपचे उमेदवार  समाधान आवताडे (Samadhan Awtade) यांनी 4256 मतांची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) पिछाडीवर असून पराभव अटळ मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक पार पडली. ही पोट निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक केली होती. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत 'तुम्ही भाजपच्या उमेदवाराला जास्त मत देऊन यांचा करेक्ट कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करतो' असं आवाहन केलं होतं. अखेर फडणवीसांच्या आवाहनाला पंढरपूरकारांनी हाक देत राष्ट्रवादीला आस्मान दाखवले आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. टपाली मतदानात समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती. मधल्या काही फेरीत आवताडे हे मागे पडले होते. पण समाधान आवताडे यांनी नंतर आघाडी घेतली ती 36 व्या फेरीपर्यंत कायम राहिली. दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोढे यांनी पंढरपूरमधील पराभव स्वीकारला आहे. 'पश्चिम बंगला भाजपाला यश नाही, आम्ही तिथे प्रचार केला नाही, त्यामुळे यश विषय आमचा नाही, पंढरपूर जागा पराभव मान्य आहे, असं लोंढे म्हणाले. त्याआधी दुसऱ्या फेरीअखेरीस  आवताडे 114 मतांनी पिछाडीवर होते. तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके 114 मतांनी आघाडी घेतली होती.  दुसऱ्या फेरी अखेर आवताडेंना 5 हजार 492  मतं मिळाली होती. तर भगीरथ भालके यांना 5 हजार 606 मतं मिळाली. तिसऱ्या फेरीत 635 मतांनी भगीरथ भालके पुढे होते. भगीरथ भालके यांना 8613 मतं मिळाली.  तर समाधान आवताडे यांना 7978 मतं मिळाली.  पण, त्यानंतर डाव पलटला. 7 व्या फेरीपासून समाधान आवताडे यांनी जोरदार मुसंडी मारली आणि मोठी आघाडी मिळवली. आतापर्यंतचा निकाल  पहिल्या फेरीत भाजपचे समाधान आवताडे ४५० मतांनी आघाडीवर - दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे 114 तर भगीरथ भालके 114 मतं, समसमान मतं - तिसऱ्या फेरीत 635 मतांनी भगीरथ भालके पुढे - 4 थ्या फेरीअखेर समाधान आवताडे 11303, भगीरथ भालके 11941, भालके 638 ने आघाडीवर - 5 फेऱ्या पूर्ण  भगीरथ भालके 521मतांनी आघाडीवर. - 7 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 100मतांनी आघाडीवर. - 8 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 2295मतांनी आघाडीवर - 11 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1503मतांनी आघाडीवर. - 12 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1409मतांनी आघाडीवर - 16 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1411 मतांची आघाडीवर - 17 व्या फेरी अखेर ९०१ मतांनी भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर - 18 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1209 मतांनी आघाडीवर - 19 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1022मतांनी आघाडीवर - 21 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे  3486मतांनी आघाडीवर - 22 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 3908 मतांनी आघाडीवर - 23 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 5807  मतांनी आघाडीवर - 25 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 6200मतांनी आघाडीवर - 36 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 4256  मतांनी आघाडीवर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 17 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भागीरत भालके यांना उमेदवारी दिली होती तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
Published by:sachin Salve
First published: