तानाशहा! तुकाराम मुंढेंनी मौखिक आदेशवर थांबवली 81 कोटींची विकास कामे, भाजपचा आरोप

तानाशहा! तुकाराम मुंढेंनी मौखिक आदेशवर थांबवली 81 कोटींची विकास कामे, भाजपचा आरोप

नागपूर महापालिकेत सत्ताधारी भाजप आणि आयुक्त तुकाराम मुंढे असा संघर्ष पाहायला मिळत आहे.

  • Share this:

नागपूर, 26 जून: नागपूर महापालिकेत सत्ताधारी भाजप आणि आयुक्त तुकाराम मुंढे असा संघर्ष पाहायला मिळत आहे. महापौर संदीप जोशी यांनी स्मार्ट सिटीमध्ये 20 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप तुकाराम मुंढेंवर केला आहे. एवढंच नाही तर तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा...पत्नीच्या पेटत्या चितेवर पतीनं घेतली उडी, अवघ्या 3 महिन्यांतच मोडला संसाराचा डाव

आता भाजपचे वरिष्ठ सदस्य दयाशंकर तिवारी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धती वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तुकाराम मुंढे यांनी नियमांची पायमल्ली करत नगरसेवकांची 81 कोटींची वर्क ऑर्डर फक्त मौखिक आदेशावर थांबवण्याचा आरोप करण्यात आला आहे.

दयाशंकर तिवारी यांनी धक्कादायक प्रकाराबाबत सभागृहात मुद्दा मांडला. तुकाराम मुंढे यांनी नियमांची पायमल्ली करत वर्क ऑर्डर थांबवल्या. मुंढे हे तानाशहा असल्याची टीका दयाशंकर तिवारी यांनी केली आहे.

दुसरीकडे, नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सदर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. स्मार्ट सिटीमध्ये 20 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप तुकाराम मुंढेंवर ठेवण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांनी मर्जीतल्या कंत्राटदारांना परस्पर कंत्राट दिल्याचा आरोप महापौर संदीप जोशी यांनी केला आहे.

आमचं सरकार असतं तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते...

नागपूर महापालिकेत सत्ताधारी भाजपविरुद्ध आयुक्त असा वाद पेटला आहे. राज्यात आमचं सरकार असतं तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते, असा दावा काही दिवसांपूर्वी महापौर संदीप जोशी यांनी केला होता. नागपूर शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावाला महापालिका प्रशासनच जबाबदार आहेत. क्वॉरंटाईन प्रक्रियेतील घोळामुळेच शहरात कोरोना रुग्ण वाढले, असा गंभीर आरोप संदीप जोशी यांनी केला आहे.

नागपुरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रण आणण्यात महानगरपालिका प्रशासन अपयशी ठरलं आहे. क्वॉरंटाईन करण्याच्या प्रक्रियेत घोळ आहे. त्यामुळे रुग्ण वाढत आहे, असा घणाघाती आरोप महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर केला आहे.

हेही वाचा..सावकार आणि पत्नीची गुंडगिरी, शेतकऱ्याच्या पत्नीसोबत अत्यंत संतापजनक वर्तन

दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत संदीप जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुकाराम मुंढे यांच्या बदलीत भाजपला कोणतेही स्वारस्य नाही, ज्यांनी मुंढेंना नागपुरात आणलं, तेच लोक लोक आता त्याचे परिणाम भोगत आहेत. आमची राज्यात सत्ता असती तर तुकाराम मुंढे नागपुरात नसते, असंही महापौर संदीप जोशी यांनी म्हटलं आहे.

First published: June 26, 2020, 5:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading