पत्नीच्या पेटत्या चितेवर पतीनं घेतली उडी, अवघ्या 3 महिन्यांतच मोडला संसाराचा डाव!

पत्नीच्या पेटत्या चितेवर पतीनं घेतली उडी, अवघ्या 3 महिन्यांतच मोडला संसाराचा डाव!

विवाहनंतर अवघ्या तीन महिन्यांत जोडप्याचा करुण अंत झाल्यानं गोंडपिपरी तालुका हादरला आहे.

  • Share this:

हैदर शेख (प्रतिनिधी),

चंद्रपूर, 22 जून: देशात स्वातंत्र्यपूर्व काळात सतीची प्रथा होती. पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या चितेवर उडी घेऊन पत्नी आपलं जीवन संपवत असे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात याउलट एक घटना घडली आहे. पत्नीच्या पेटत्या चितेवर उडी घेऊन पतीनं जीवनाचा त्याग केला आहे. विवाहनंतर अवघ्या तीन महिन्यांत जोडप्याचा करुण अंत झाल्यानं गोंडपिपरी तालुका हादरला आहे. किशोर खाटीक आणि रुचिता खाटीक असं मृत दाम्पत्याचं नाव आहे. गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम-तळोधी गावात ही घटना घडली आहे.

हेही वाचा.. अजितदादा भडकतात तेव्हा... VVIP रेस्ट हाऊसमधून कोरोना योद्धांना काढलं बाहेर

मिळालेली माहिती अशी की, चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी इथल्या एका 19 वर्षीय नवविवाहितेनं दोन दिवसांपूर्वी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. यावेळी ती दोन महिन्यांची गर्भवती होती. राळेपेठ मार्गालगत असलेल्या स्मशानभूमीत त्या नवविवाहितेवर अत्यंसंस्कार करताना पेटत्या सरणावर अचानक तिच्या पतीनं उडी घेतली. या प्रकारानं अंत्यसंस्काराला उपस्थित लोकांत एकच खळबळ उडाली. शेवटी उपस्थितांनी हिम्मत करून त्याला सरणावरुन कसंबसं बाहेर काढलं. पण तोपर्यंत तो चांगलाच जळाला होता. हा पती इथंच थांबला नाही. सरणावरून बाहेर काढताच त्यानं लोकांना चुकवून जवळच असलेल्या विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं. किशोर खाटीकचा विवाह भंगाराम तळोधी येथील रुचिता चिट्टावार हिच्याशी विवाह गेल्या 19 मार्च रोजी झाला होता. ती आपल्या पतीसह चंद्रपूरला वास्तव्यास होती.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी रुचिता भंगाराम तळोधी इथं माहेरी आली होती. रविवारी सायंकाळच्या सुमारास ती शौचाच्या बहाण्यानं घराबाहेर पडली आणि परतलीच नाही. तिनं गावलागतच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी चिता पेटली  आणि या पेटत्या चितेवर किशोरनं उडी घेतली.

हेही वाचा..कोरोना पॉझिटिव्ह सांगून क्वारंटाईन सेंटरमध्ये बोलावून तरुणीसोबत केलं भलतंच

रुचितानं आत्महत्या का केली, हा तपासाचा विषय असतानाच तिच्या पतीनंही असं टोकाचं पाऊल उचलून एका वेगळ्या चर्चेला जन्म दिला. या नवदाम्पत्याच्या अकाली आणि अनपेक्षित आत्महत्यांमुळं लोकांत हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रकरणाचा तपास गोंडपिंपरी पोलीस करीत आहेत.

First published: June 22, 2020, 7:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading