नागपूर, 24 जून : अस्मानी संकटाने हवालदील झालेल्या शेतकऱ्याला अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कर्जबाजारी होऊन शेतकऱ्याला शेती टिकवावी लागते. पण, पैशाच्या तगादा लावत सावकारांकडून गुंडगिरीचे प्रकार समोर आले आहे. नागपूरमध्ये एका सावकाराने जमीन हडपण्यासाठी महिला शेतकऱ्याला धक्काबुक्की करत मारहाण केली.
नागपुर जिल्ह्यातील भवापुर तालुक्यात ही धक्कादायक घटना समोर आला आहे. या अवैध सावकाराने आपल्या पत्नीच्या हाताने लोकांच्या घोळक्यात महिला शेतकऱ्याला मारहाण केली. एवढंच नाहीतर या घटनेचा व्हिडिओही तयार करून व्हायरल करण्यात आला. हा व्हिडिओ नेमका कुणी काढला हे मात्र, अद्याप कळू शकले नाही.
पीडित महिला शेतकऱ्याची वाकेश्वर इथं एक हेक्टर शेती आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले होते. त्यामुळे पीडित महिलेच्या पतीने सावकराकडून कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम आणि व्याज हे सावकाराला दिले. पण, सावकाराने ते घेण्यास नकार दिला. 20 जून रोजी सावकार विक्रीपत्र घेऊन शेतीचा ताबा घेण्यासाठी पोहोचला हे पाहून महिला धक्का बसला. शेतकरी आणि त्याच्या पत्नीने सावकराला विरोध केला.
...तर उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा का करावी, भाजप आमदाराचा सवाल
सावकाराने लाठ्या काठ्या घेऊन शेतकरी दाम्पत्याला दमदाटी केली. या अवैध सावकाराने आपल्यासोबत आपल्या पत्नीलाही घेऊन आला होता. त्याच्या पत्नीने लोकांच्या गर्दीत शेतकरी महिलेला दमदाटी केली आणि मारहाण केली. शरमेची बाब म्हणजे, या सावकाराच्या पत्नीने पीडित महिलेची साडी ओढली.
याहुन धक्कादायक म्हणजे, हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. यावेळी शेतात 5 ते 6 लोकं उपस्थितीत होते. पण कुणाही या महिलेच्या मदतीला धावून आलं नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले.
शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना, भाजप आमदार पडळकरांची जहरी टीका
या प्रकरणी अखेर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2017 मध्ये तक्रारदार आणि सावकरामध्ये जमिनीची व्यवहार झाला होता. त्यानंतर तक्रारदाराने कर्ज आणि व्याजाचे पैसे दिले होते. पण, सावकराने माझी फसवणूक केली आणि जमिनीचे विक्री खत तयार केले, अशी तक्रार पीडित शेतकऱ्याने दिली आहे. या प्रकरणी सावकाराला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.