जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राजकारणातली मोठी बातमी : या कारणांमुळे होतोय सत्ता स्थापनेस उशीर!

राजकारणातली मोठी बातमी : या कारणांमुळे होतोय सत्ता स्थापनेस उशीर!

राजकारणातली मोठी बातमी : या कारणांमुळे होतोय सत्ता स्थापनेस उशीर!

शिवसेनेने वाचाळ नेत्यांना आवर घालावा अशी भाजपश्रेष्ठींची भूमिका आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    प्रशांत लीला रामदास, मुंबई 28 ऑक्टोंबर : भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेबाबत अजुनही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. भाजपला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्याने शिवसेनेचे बळ वाढले असून शिवसेना सत्तेत समसमान वाटा मागत असल्याने मोठा अडसर निर्माण झालाय. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे भाजपचे श्रेष्ठी नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळेच भाजपकडून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही अशीही माहिती आहे. शिवसेनेने वाचाळ नेत्यांना आवर घालावा अशी भाजपश्रेष्ठींची भूमिका आहे. अशीच वक्तव्य येत राहिली तर पुढच्या वाटाघाटी अडचणीत येऊ शकतात असे संकेतही भाजपने दिले आहेत. फ्लॅट जप्ती प्रकरणावर धनंजय मुंडेंचा खुलासा! शिवसेना नेत्यांच्या वाचाळ भूमिकेमुळे अमित शाह यांच्या मातोश्री भेटीवर प्रश्नचिन्ही निर्माण होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य उद्धव ठाकरेंची अधिकृत भूमिका आहे का असा सवाल भाजपने केलाय.संजय राऊत अनेकवेळा काहीतरी बोलतात आणि पुढे ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे असं म्हणत शिवसेना त्यांच्यापासून फारकत घेते. सत्ता स्थापनेबाबत सेनेची डरकाळी, ‘आता जे काही होईल ते…’ दरम्यान महायुतीतला मित्रपक्ष असलेला रिपब्लिकन पक्षाने भाजप आणि सेना एकत्र येऊन सरकार स्थापन करतील असं म्हटलंय. रामदास आठवले म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ नेतेपदी निवड होईल असा विश्वास आहे. आठवले पुढे म्हणाले, दोघांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. सेना लिखित आश्वासन मागते आहे त्याबाबत भाजप विचार करेल. शिवसेनेपेक्षा भाजपकडे दुप्पट आमदार आहेत. अमित शहा मुंबईत आले की, उध्दव ठाकरे यांना भेटतील. फडणवीस आणि ठाकरे यांना एकत्र बसवून निर्णय घेतील असंही आठवले म्हणाले.

    राज्याच्या राजकारणात ट्विस्ट, सेनेच्या भूमिकेमुळे शरद पवार भाजपसाठी ‘गेमचेंजर’?

    युतीचं सरकार येणार असलं तरी त्यातही सत्तेत कोणाला किती वाटा मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 50-50 फॉर्म्युल्यानुसार सरकार स्थापन होईल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर म्हटलं होतं. दरम्यान, 15 बंडखोर आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं.

    ‘…अन् पंक्चर झालेली गाडी 105 च्या स्पीडने सुसाट’, खासदार अमोल कोल्हेंची पोस्ट

    भाजप आणि शिवसेना यांच्यातच आता बंडखोर आणि अपक्षांना पक्षात घेण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. आतापर्यंत सेनेला चार आमदारांनी पाठिंबा दिला आहे. तर आतापर्यंत तीन नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. मीरा भाईंदरच्या बंडखोर आमदार गीता जैन यांच्या पाठोपाठ अपक्ष आमदार रवी राणा आणि राजेंद्र राऊत यांनीही भाजपला पाठिंबा दिला.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात