जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / '...अन् पंक्चर झालेली गाडी 105 च्या स्पीडने सुसाट', खासदार अमोल कोल्हेंची पोस्ट व्हायरल

'...अन् पंक्चर झालेली गाडी 105 च्या स्पीडने सुसाट', खासदार अमोल कोल्हेंची पोस्ट व्हायरल

'...अन् पंक्चर झालेली गाडी 105 च्या स्पीडने सुसाट', खासदार अमोल कोल्हेंची पोस्ट व्हायरल

लोकसभेनंतर खासदार अमोल कोल्हेंची खिल्ली उडवणारे मीम्स व्हायरल झाले होते. त्याला उत्तर देणारी पोस्ट सोशल मीडियावरून केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 28 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरून ऑगस्ट महिन्यात व्हायरल झालेल्या पोस्टला अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलं आहे. ऑगस्टमध्ये अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवस्वराज्य यात्रा काढली होती. त्यावेळी एक लहान मुलगा पंक्चर झालेल्या ट्रकच्या टायरमध्ये तोंडाने हवा भरत असलेले मीम्स व्हायरल झाले होते. व्हायरल मीममध्ये पंक्चर टायरमध्ये हवा भरणाऱ्या मुलाला अमोल कोल्हे असं नाव देण्यात आलं होतं. तर टायरला राष्ट्रवादी म्हटलं होतं. या मीम्सला अमोल कोल्हे यांनी सडेतोड़ उत्तर दिलं आहे. अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर मीम शेअर केलं आहे. अमोल कोल्हेंनी म्हटलं की, सहज फोन चाळताना ऑगस्ट महिन्यातली एक पोस्ट समोर आली आणि सहज सुचलं. फुंकर तीच असते..जी मेणबत्ती विझवू शकते अन् निखारा चेतवू शकते.. टीकेच्या वाऱ्याने भेलकांडायचं की तेच वारं शिडात भरून घ्यायचं.. आपलं आपण ठरवायचं! कदाचित त्यावेळी पोस्ट तयार करणारा “गोवर्धन” उचलण्याची गोष्ट विसरला असावा. महाराष्ट्रात “शरदचंद्रजी पवार” नावाचा झंझावात आला अन (पोस्ट टाकणाऱ्या व त्यावर हसणाऱ्यांना) पंक्चर वाटणारी गाडी 105 च्या स्पीडने सुसाट निघाली.”

    लोकसभा निवड़णुकीत विजय मिळवलेल्या अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवस्वराज्य यात्रा काढली. या यात्रेत दिग्गज नेते, पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांना नेतृत्व न देता अमोल कोल्हेंकडे दिल्यानं मीम्स व्हायरल झाली होती. अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीला ग्रामीण भागात विशेषत: तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळवून दिला. चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पराभवाचं सांगितलं कारण, म्हणाले…

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात