जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 24 तासांत तीन धक्कादायक MURDER, महिलेची बलात्कारानंतर हत्या तर प्रेमसंबंधातून तरुणाला संपवलं!

24 तासांत तीन धक्कादायक MURDER, महिलेची बलात्कारानंतर हत्या तर प्रेमसंबंधातून तरुणाला संपवलं!

24 तासांत तीन धक्कादायक MURDER, महिलेची बलात्कारानंतर हत्या तर प्रेमसंबंधातून तरुणाला संपवलं!

तरुणाची प्रेम प्रकरणातून हत्या करून त्याला एका चाळीच्या छताच्या लोखंडी छताला रस्सीने टांगून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

रवी शिंदे, प्रतिनिधी भिवंडी, 16 सप्टेंबर : भिवंडी तालुक्यात विविध ठिकाणी 24 तासांत खूनाचे तीन प्रकार घडले असून या घटनांनी संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे (गोठणपाडा ) इथल्या कामगार महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिच्या साडीच्या पदराने गळा आवळून हत्या केल्याचं समोर आलं आहे. तर पडघ्या लगतच्या कुरुंद गावातील तरुणाची प्रेम प्रकरणातून हत्या करून त्याला एका चाळीच्या छताच्या लोखंडी छताला रस्सीने टांगून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तिसऱ्या घटनेत तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणगांव इथल्या केस कर्तनालयात काम करणाऱ्या मेहुण्यांमध्ये क्षुल्लक वाद होऊन भांडण झाल्याने भावोजींची हत्या केल्याची घटना घडली आहे. गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे इथली महिला प्रिती दिलीप भावर(29 ) ही महिला अन्य महिलांसोबत वालीव, ता.वसई इथे कामावर जात होती. ती काल सायंकाळी एसटी बसने महाळुंगे बस स्टॉपवर उतरून दुकानातून घरगुती सामान खरेदी करून घराच्या दिशेने निघाली होती. राहत्या घरी जाण्यासाठी झाडाझुडपातून जावं लागत असल्याने ती एकटीच रस्त्याने जात असताना अचानक तिची गाठ नराधमांसोबत पडली. तिला दोघा नराधमांनी उचलून निर्जनस्थळी झाडाझुडपात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्यांनी तिच्याच साडीच्या पदराने मिहिलेची गळा आवळून हत्या केली. रात्री उशिरापर्यंत प्रिती घरी परतली नाही. त्यावेळी पती दिलीप याने तिची चौकशी वहिनीकडे केली. त्यावेळी ती अन्य महिलांच्या पुढे घरी निघाल्याचे सांगण्यात आलं. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी दिलीप महाळुंगे नाक्याकडे निघाला आणि त्याने पत्नी प्रिती हिच्याबाबत चौकशी केली. त्यावेळी दुकानदाराने प्रिती साडेसात वाजेच्या सुमारास दुकानातून सामान घेऊन निघाल्याचे सांगितलं. त्यावेळी भयभीत झालेल्या दिलीप याने रस्त्याने पायपीट करीत पत्नी प्रिती हिचा शोध घेतला असता बंधाऱ्याच्या अलीकडच्या रस्त्याच्या कडेला प्रितीची छत्री आणि हातरुमाल पडल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्याने अधिक पुढे जाऊन पाहिलं असता पत्नीच्या अंगावरील कपडे फाटलेल्या अवस्थेत ती निपचित पडल्याचे निदर्शनास आलं. इतर बातम्या - केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात, कधीही होऊ शकते विधानसभेची घोषणा! पत्नीची अवस्था पाहून त्याने हंबरडाच फोडला आणि तात्काळ याची माहिती पाड्यातील नागरिकांना दिली. या घटनेबाबत तात्काळ गणेशपुरी पोलीस ठाण्यात कळवण्यात येताच अंबाडी पोलीस उपअधिक्षक दिलीप गोडबोले, पोलीस ठाण्याचे इंचार्ज महेश सगडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. इतर बातम्या - BREAKING: डोळ्यांदेखत पत्नी आणि मुलाचा बुडून मृत्यू, पतीचा असा वाचला जीव तरुण मुलाचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला…. पडघ्या लगतच्या कुरुंद गावातील सागर सुरेश पठारे ( 27) या तरुणाचा मृतदेह कुरुंदच्या दाता, आदिवासीवाडी इथल्या साईनाथ भोईर यांच्या निवासी चाळीच्या छताच्या लोखंडी एंगलला गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला. सोमवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला आहे. सागर रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास जेवण करून घरातून निघाला होता. तो आदिवासी वाडी येथील गणपतीत गेला असावा असं कुटूंबियांना वाटलं. मात्र, त्याने गळफास घेतल्याच्या घटनेची माहिती मिळताच कुटूंबियांना धक्काच बसला. त्याचे इथल्या एका मुलीवर प्रेम होते. त्यातूनच त्याची हत्या केली असावी असा आरोप मृत सागर याच्या कुटूंबियांनी केला आहे. पडघा पोलिसांनी त्याचा मृतदेह शविच्छेदनासाठी कुटूंबियांच्या म्हणण्यानुसार मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवला असून तेथील वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे. इतर बातम्या - प्रेम विवाहानंतर लेकीचा सुखी संसार घरच्यांना पहावला नाही, जोडप्याला संपवलं! क्षुल्लक वाद झाल्याने मेहुण्याने सख्या भावोजींची धारदार हत्याराने केली हत्या तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणगांव येथील केशकर्तनालयात काम करणाऱ्या सख्या मेहुण्यांमध्ये क्षुल्लक वाद झाल्याने या वादातून मेहुण्याने सख्या भावोजींची धारदार हत्याराने हत्या केल्याची घटना घडली आहे. अमिन जलील शेख ( 40) असं हत्या झालेल्या भावोजीचं नांव आहे. त्याचं धामणगांव इथे ए - वन केस कर्तनालय नावांचे दुकान असून त्या दुकानात अरमान सलीम शेख (30) हा देखील मृतासोबत काम करीत होता. मात्र, अरमान यास दारू व नशेचे पदार्थ पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे अमिन हा त्यास विरोध करून नशा करण्यास मनाई करायचा. त्यावरून दोघांमध्ये मध्यरात्री कडाक्याचे भांडण झाले. इतर बातम्या - धक्कादायक! जेलमध्ये अंडरवेअर आणि बनियनचा बनवला फास, कैद्याने केली आत्महत्या यावेळी अरमान याने रागाच्या भरात आपला मेहुणा अमिन याच्या डोक्यात धारदार वस्तूने प्रहार केला. त्यामध्ये तो जागीच ठार झाला आहे. या घटनेचा तालुका पोलीस ठाण्यात अरमान याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. त्यास सोमवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे करीत आहे. VIDEO: उद्धव आणि फडणवीसांमध्ये चढाओढ, कोण रचणार राम मंदिराची पहिली वीट?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात