केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात, कधीही होऊ शकते विधानसभेची घोषणा!

केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात, कधीही होऊ शकते विधानसभेची घोषणा!

मंगळवारी आणि बुधवारी मुंबईत येऊन स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. मुंबईत आढावा घेतल्यानंतर बुधवार पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 16 सप्टेंबर : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मुंबईत येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. हे पथक मंगळवारी आणि बुधवारी मुंबईत येऊन स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. मुंबईत आढावा घेतल्यानंतर बुधवार पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, याच वेळी निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 2 दिवसांत विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत निवडणुकांचा आढावा घेतल्यानंतर त्याचे रिपोर्ट दिल्लीत सादर केले जातील. त्यानंतर पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता जाहीर केली जाईल. महाराष्ट्रासह तीन राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commision of India) महाराष्ट्र (Maharashtra), हरियाणा (Haryana) आणि झारखंड (Jharkhand)या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करू शकते. या तिन्ही राज्यात या वर्षा अखेरीस निवडणुका पार पडणार आहेत.

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये पहिला निवडणुका होतील. अर्थात अद्याप या दोन्ही राज्यांतील निवडणुकीसंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केलेली नाही. या दोन्ही राज्यात दिवाळीच्या आधी नवे सरकार स्थापन होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या घोषणेसंदर्भात केंद्रीय निवडणू्क आयोगाची बैठक देखील होणार आहे. या बैठकीत तिन्ही राज्यातील निवडणुकांची घोषणा कधी करायची यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या - राज ठाकरे यांची 'ही' भूमिका शरद पवारांना मान्य नाही!

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. तर हरियाणा आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 90 आणि 82 जागा आहेत. या तिन्ही राज्यात ऑक्टोबर 2014 विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते. तिन्ही राज्यातील विधानसभेचा कालावाधी लवकरच संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरु केली आहे.

इतर बातम्या - 'साहेबां'च्या दौऱ्यात भुजबळांची 'दांडी'; अखेर शरद पवारांनीच केला खुलासा!

तिन्ही राज्यात भाजपची सत्ता

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तिन्ही राज्यात 2014मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप(Bharatitya Janta Party)ने सत्ता मिळवली होती. महाराष्ट्रातील 288 पैकी 122 जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)मुख्यमंत्री झाले होते. हरियाणातील 90 पैकी 47 जागांवर भाजपने विजय मिळवला होता आणि मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar)यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते. झारखंडमध्ये 77 पैकी 35 जागांवर विजय मिळवत भाजपने सत्ता मिळवली होती आणि रघुबर दास (Ragubhar Das) हे मुख्यमंत्री झाले होते.

VIDEO: उद्धव आणि फडणवीसांमध्ये चढाओढ, कोण रचणार राम मंदिराची पहिली वीट?

Published by: Renuka Dhaybar
First published: September 16, 2019, 7:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading