बरेली (उत्तर प्रदेश)14 सप्टेंबर : अत्यंत सुरक्षित समजल्या जाणार्या जिल्हा कारागृहात कैदेत असलेल्या सुजात नावाच्या कैद्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. अंगावरील कपड्याने फाशी घेण्यासाठी दोरी तयार केली आणि त्यानेच कैद्याने स्वत:ला संपवलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण तुरुंगात आणि जेल प्रशासनात खळबळ उडाली आहे. खरंतर हे कारागृह सगळ्यात सुरक्षित आणि कठोर असल्याचं समजलं जातं. तिथे हा प्रकार झाल्यामुळे भीतीचं वातावरण तयार झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वहिणीच्या हत्येप्रकरणी कैद्याला दोन भावांसह पत्नीला तुरूंगात टाकण्यात आलं होतं. या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. शनिवारी, कैद्याने त्याच्या अंडरवेअर आणि बनियनचा फाशीचा दोऱखंड बनवून त्यानेच गळफास घेतला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसानी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सुजातच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी जिल्हा कारागृह अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाने हत्या केल्याचा आरोप केला आहे. उत्तर प्रदेशच्या कोतवाली शहरात राहणाऱ्या सुजातच्या वहिणीने 28 मे 2012 रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणात सुजातला त्याच्या दोन भावांसह पत्नीसह तुरूंगात टाकण्यात आलं होतं. तेव्हापासून हे सगळे आरोपी तुरुंगात शिक्षा भोगत होते. रात्री उशीरा कैद्यांची संख्या मोजण्यात येते. यावेळी पोलिसांना सुजात गैरहजर दिसला. जेव्हा शोध घेतला असता त्याचा मृतदेह सापडला. त्याने त्याच्या अंगावरी अंडरवेअर आणि बनियनची दोरी बवनली आणि आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. सुजातच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी जिल्हा कारागृह अधिकाऱ्यांवर हत्या केल्याचा आरोप केला आहे. तर या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. इतर बातम्या - खळबळजनक! भर रस्त्यात लेकराचा झाला खून, मृतदेहाला पाहून आईचा आक्रोश कुख्यात गुंडाला मारण्याचा शार्प शूटरचा प्लॅन पोलिसांनी उधळला; पिस्तुल, स्क्रू ड्रायव्हर, सत्तूर ताब्यात पंढरपुरातील गँगवॉर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पंढरपुरातील कुख्यात गुंड भैय्या पवार याचा खून करण्यासाठी सोलापुरात आलेल्या चौघांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे तर आणखी दोन आरोपींनी पलायन केल्याची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे. सोमनाथ खंकाळ, विजय कबाडे, प्रशांत धोत्रे, नरेश घोरपडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. इतर बातम्या - भाजप-सेनेच्या ‘युती वादा’वर काँग्रेस भाजणार पोळी, आजच्या बैठकीत मोठा निर्णय भैय्या पवार हा गणेशोत्सवासाठी सोलापूरमध्ये येणार असल्याने सरजी गँगचं चार शूटर सोलापुरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसारच आरोपींनीही कबुली जबाब दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सोलापुरातील आरटीओ कार्यालयाजवळ असलेल्या एका फ्लॅटमध्ये धाड टाकली असता 4 आरोपींसह त्यांच्याकडे दोन पिस्तुल, चार जिवंत काडतुसं, दोन सत्तूर, दोरखंड, मिरची पुडी, स्क्रू ड्रायव्हर आणि दोरखंड असं साहित्य आढळून आलं. त्यांच्याकडून दोन मोबाईल आणि चार मोटारसायकली असा एकूण 3 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इतर बातम्या - उदयनराजेंनी का केला भाजपमध्ये प्रवेश? राजू शेट्टींनी सांगितलं खरं कारण…! दरम्यान, या 4 आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे जिल्हाभरात मोठी खळबळ माजली आहे. तर या 4 आरोपींकडे पिस्तूल आणि जिवंत काडतूसं कशी आली याचा आता पोलीस शोध घेत आहेत. VIDEO : कसं काय ‘राजे’ खरं हाय का? ‘ईव्हीएम’चं आता बरं हाय का?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.