तरनतारन (पंजाब), 15 सप्टेंबर : प्रेम प्रकरणातून गुन्ह्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यात सैराट सिनेमासारखेही अनेक गुन्हे घडले आहेत. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. चार महिन्यांपूर्वी प्रेम विवाह करणाऱ्या लेकीला आणि तिच्या नवऱ्याला मुलीच्या कुटुंबीयांकडून मारून टाकण्यात आलं आहे. दोघांवरही त्यांच्याच घरात घुसून गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये मुलगी आणि तिच्या नवऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नौशेरा धाला गावात राहणाऱ्या अमनदीप सिंगचे अमनप्रीत कौर नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. मुलीचे कुटुंबीय त्यांच्या प्रेमाविरोधात होते. पण असं असतानाही, चार महिन्यांपूर्वीच या दोघांनी कुटुंबाविरूद्ध लग्न केलं. पण मनाविरुद्ध घरातल्या लेकीने विवाह केल्यामुळे कुटुंबीय या दोघांवर नाराज होते. अखेर नाराजी काढण्यासाठी त्यांनी दोघांचीही हत्या केली. प्रेम करून विवाह केल्यानंतर दोघांचा सुखी संसार सुरू असल्याची माहिती अमनदीप आणि अमनप्रीत यांच्या शेजाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
या प्रेमी जोडप्याचा सुखी संसार अशा प्रकारे विझल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मुलीच्या सुखाचा विचार न करता कुटुंबीयांनी मुलीला आणि तिच्या नवऱ्याला संपवलं. या दोघांना संपवण्यासाठी कुटुंबीयांनी मोठा कट रचला होता. रविवारी संधी पाहून मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांवरही गोळीबार केला. ज्यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
इतर बातम्या - भाजपच्या पहिल्याच मोठ्या कार्यक्रमामधून गणेश नाईकांचा काढता पाय
300 फूट खोल दरीत आढळला तरुणीचा मृतदेह...
लोणावळा येथील लायन्स पॉइंटच्या 300 फूट खोल दरीत तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अलिजा राणा (वय-24) अशी मृत तरुणीची ओळख पटली आहे. 12 सप्टेंबरला अलिजाची पर्स एका दगडाच्या कठड्यावर पोलिसांना सापडली होती. अलिजा हिने खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी वर्तविला आहे.
तीन दिवसांपासून सुरू होता शोध...
शिवदुर्ग रेस्क्यू टीम मागील तीन दिवसांपासून अलिजाचा शोध घेत होती. अखेर लायन्स पॉईंटच्या खोल दरीमध्ये 300 फुटावर रविवारी अलिजाचा मृतदेह आढळून आला. दोरीच्या साह्याने मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.
इतर बातम्या - साता जन्माचं वचन दिलेल्या पतीची निर्घृण हत्या, पोलिसांना फोनवर पत्नी म्हणते...!
काही कळण्याआधीच कोसळली वीज, पाहा LIVE VIDEO