BREAKING: डोळ्यांदेखत पत्नी आणि मुलाचा बुडून मृत्यू, पतीचा असा वाचला जीव

पुजा सातपुते ( वय 36 ) आणि मुलगा ओंकार सातपुते ( वय 13 ) अशी बुडून मृत्यू झालेल्या माय लेकरांची नावं आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2019 11:30 PM IST

BREAKING: डोळ्यांदेखत पत्नी आणि मुलाचा बुडून मृत्यू, पतीचा असा वाचला जीव

शिर्डी, 15 सप्टेंबर : शिर्डीमध्ये मायलेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुळा धरणात बुडून माय लेकाचा मृत्यू झाला असल्याचा प्रकार घडला आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  कुटुंबासह फिरायला गेले असता अशी दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेमध्ये पतीचा जीव वाचला आहे तर पत्नी आणि मुलाचा जीव गेल्याचं सांगण्यात येत आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे.

पुजा सातपुते ( वय 36 ) आणि मुलगा ओंकार सातपुते ( वय 13 ) अशी बुडून मृत्यू झालेल्या माय लेकरांची नावं आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुार, ओंकारचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडिल पाण्यात गेले. पण त्यांनाही पोहता येत नव्हतं. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी आई पुजादेखील पाण्यात गेली. त्यांनी पतीला पाण्यातून बाहेर खेचलं पण यात मुलाला वाचवण्यासाठी त्या पुढे गेल्या आणि त्यात त्यांचाही त्यात मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मयत मायलेक नगरच्या बोरुडेमळा इथले रहिवासी आहेत. त्यांच्या अशा जाण्याने सातपुते कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर संपूर्ण गावात या प्रकारामुळे शोककळा पसरली आहे. या अपघाताची माहिती मिळताच इतर पर्यटकांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तर मृत आई आणि मुलाचा मृतदेह बाहेर काढण्याचं काम सध्या पोलीस करत आहे. डोळ्यांदेखत आपल्या पत्नी आणि मुलाला अशा प्रकारे गमावल्यामुळे गणेश सातपुते यांना मोठा धक्का बसला आहे.

प्रेम विवाहानंतर लेकीचा सुखी संसार घरच्यांना पहावला नाही, गोळ्या घालून जोडप्याला संपवलं!

Loading...

प्रेम प्रकरणातून गुन्ह्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यात सैराट सिनेमासारखेही अनेक गुन्हे घडले आहेत. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. चार महिन्यांपूर्वी प्रेम विवाह करणाऱ्या लेकीला आणि तिच्या नवऱ्याला मुलीच्या कुटुंबीयांकडून मारून टाकण्यात आलं आहे. दोघांवरही त्यांच्याच घरात घुसून गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये मुलगी आणि तिच्या नवऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

इतर बातम्या - VIDEO: तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं, PUBGमुळे बडबडतो 'पुढं हेडशॉट मारतो मी'

मिळालेल्या माहितीनुसार, नौशेरा धाला गावात राहणाऱ्या अमनदीप सिंगचे अमनप्रीत कौर नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. मुलीचे कुटुंबीय त्यांच्या प्रेमाविरोधात होते. पण असं असतानाही, चार महिन्यांपूर्वीच या दोघांनी कुटुंबाविरूद्ध लग्न केलं. पण मनाविरुद्ध घरातल्या लेकीने विवाह केल्यामुळे कुटुंबीय या दोघांवर नाराज होते. अखेर नाराजी काढण्यासाठी त्यांनी दोघांचीही हत्या केली. प्रेम करून विवाह केल्यानंतर दोघांचा सुखी संसार सुरू असल्याची माहिती अमनदीप आणि अमनप्रीत यांच्या शेजाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या - पाकड्यांचं डोकं फिरलंय, म्हणे शाहिद आफ्रिदीला PM करा!

या प्रेमी जोडप्याचा सुखी संसार अशा प्रकारे विझल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मुलीच्या सुखाचा विचार न करता कुटुंबीयांनी मुलीला आणि तिच्या नवऱ्याला संपवलं. या दोघांना संपवण्यासाठी कुटुंबीयांनी मोठा कट रचला होता. रविवारी संधी पाहून मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांवरही गोळीबार केला. ज्यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

VIDEO: भाजपच्या मंचावर उदयनराजेंनी पहिल्यांदा उडवली कॉलर आणि म्हणाले...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2019 11:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...