भिवंडी, 28 एप्रिल: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे भिवंडी शहरात स्थलांतरीत झालेल्या लाखो परप्रांतीय मजूर-कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. महानगरपालिका प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय सुरू केलेले कम्युनिटी किचनमध्ये तांदुळच नसल्याने मंगळवारी तब्बल 6000 नागरिकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.
महानगरपालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ही परिस्थिती ओढवल्याची तक्रार स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून 15000 नागरिकांना जेवण देणाऱ्या धर्मराजा ग्रुपने केली आहे.
हेही वाचा.. भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या घरी हत्याकांड, बापानेच पोटच्या 2 मुलांना घातल्या गोळ्या
भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीत लाखो परप्रांतीय मजूर वास्तव्यास आहेत. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या मजूर-कामगार वर्गाच्या जेवणाची व्यवस्था सुरुवातीच्या 21 दिवसांच्या लॉकडाऊन कालावधीत करण्यासाठी भिवंडी शहरातील तब्बल 144 स्वयंसेवी संस्था पुढे येऊन त्यांनी आपापल्या परीने या कामगारांची भूक भागवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा.. बापरे! मास्क लावला नाही, तर 8 लाख रुपयांचा दंड; कोणत्या देशाने घेतला हा निर्णय?
त्यानंतर पुन्हा 19 दिवसांचा लॉकडाऊन वाढल्यानंतर काही स्वयंसेवी संस्थांनी आपला हात आखडता घेतला. त्या वेळेस शासनाच्या निर्देशानुसार भिवंडी महापालिका प्रशासनाने पाच प्रभाग समितीनिहाय कम्युनिटी किचन सुरू करून कामगारांना जेवण पुरवण्याचा निर्णय घेतला. परंतु आज प्रभाग समिती क्रमांक 3 अंतर्गत स्वर्गीय प्रेमाताई पाटील सभागृह याठिकाणी जेवण बनवण्यासाठी तांदूळ नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे जेवण तयार होऊ शकलं नाही. त्यामुळे या कम्युनिटी किचनवर अवलंबून असलेले तब्बल 6 हजार नागरिक दुपारच्या जेवणाला मुकावे लागले.
महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेलं कम्युनिटी किचन बंद असल्याची वार्ता समजल्यावर स्थानिक नगरसेवक संतोष शेट्टी यांनी त्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. दररोज जेवणाचे पाकीट घेऊन जाणाऱ्यांनी आपली मागणी एक दिवस आधी कळवले नाही. त्यात महापालिका प्रशासन फक्त एक दिवस पुरेल एवढंच धान्य देत असल्यामुळे गैरसमजातून ती हा प्रकार झाला. यापुढे विमान दोन दिवस पुरेल एवढे धान्य कम्युनिटी किचन येथे द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा..आणखी 2 साधूंची हत्या, भाजपमध्ये 'इतना सन्नाटा क्यों है भाई?', काँग्रेसचा सवाल
25 मार्च रोजी सुरु झालेल्या लॉकडाऊनपासून ताडाळी येथील धर्मराजा ग्रुपच्या वतीने नगरसेवक नीलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला 5000 नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. परंतु मागणी वाढत गेली तशी 15000 जेवणाची पाकीट या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून वितरित करण्यात आले. परंतु या कार्यास महानगरपालिका प्रशासन व शासकीय यंत्रणा कोणतीही धान्य स्वरूपात मदत देत नसल्याने व महानगरपालिका प्रशासन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून स्थलांतरित मजुरांना जेवण देत असल्याचा दावा करीत असल्याने धर्मराज ग्रुपच्या वतीने सुरू असलेलं जेवण वितरण तब्बल 33 दिवसांनंतर बंद करण्यात केले. मात्र महापालिका प्रशासन आपल्या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून या मजुरांची भूक भागवण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप नगरसेवक नीलेश चौधरी यांनी केला आहे.
संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.