जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO : वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून दिला रेडाच; अतरंगी मित्रांची बीडमध्ये तुफान चर्चा

VIDEO : वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून दिला रेडाच; अतरंगी मित्रांची बीडमध्ये तुफान चर्चा

VIDEO : वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून दिला रेडाच; अतरंगी मित्रांची बीडमध्ये तुफान चर्चा

बीड शहरातील सामाजिक कार्यकर्ते परशुराम गुरखुदे यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

  • -MIN READ Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 13 डिसेंबर : मित्राच्या वाढदिवसाला कोण काय कधी गिफ्ट देईल याचा भरोसा नाही. कारण, अशीच एक घटना समोर आली आहे. बीडच्या हौशी मित्रांच्या गिफ्टची चर्चा सुरू आहे. आपल्या दोस्ताला आवडणारी भेट म्हणून, 10 मित्रांनी मिळून चक्क एक रेडा गिफ्ट दिला आहे. बीड शहरातील सामाजिक कार्यकर्ते परशुराम गुरखुदे यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक मित्राच्या संकटात धावून जाणारे परशुराम गुरखुदे हे अनेक तरुणांच्या गळ्यातले ताईत आहेत. आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र कंपनीने त्यांच्यासाठी चक्क एक रेडा भेट म्हणून दिला आहे. या रेड्याला पाहूनच भल्या भल्यांना घाम फुटेल. या रेड्याची उंची 6 फूट तर लांबी 7 फूट आहे. असा डौलदार रेडा आणि त्याच्या अंगावर वाघाची डिजाईन केली आहे. हेही वाचा -  महापुरुषांची प्रेरणा घेऊन बोलायचं असतं, पण…, पंकजा मुंडेंचं राज्यपालांच्या विधानावर मोठं भाष्य हा रेडा ज्यावेळेस बीडच्या माळीवेस भागात वाजत गाजत आला त्यावेळेस नागरिक त्याकडे पाहतच राहिले. काही क्षणासाठी गर्दीतून पाहिल्यानंतर वाघच आला की काय? असा भास नागरिकांना होऊ लागला. हेच गिफ्ट पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. मित्र परिवाराने दिली ही प्रतिक्रिया - तर याविषयी ज्या मित्रांनी हा रेडा गिफ्ट केलाय, ते म्हणाले की आमच्या सर्व मित्राच्या संकटाच्या वेळी आमचा वाघासारखा मित्र धावून येतो. त्यामुळे या मित्राला काय गिफ्ट द्यायचं? हा विचार आमच्या मनामध्ये होता. तब्बल एक महिना आम्ही या रेड्याचा शोध करत होतो. एक महिन्यानंतर हा रेडा आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे आमच्या वाघासारख्या मित्राला गिफ्ट देताना आम्ही या रेड्याला देखील वाघासारखी रंगरंगोटी करून दिला, अशी प्रतिक्रिया परशुराम गुरखुदे यांच्या मित्र परिवाराने दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात