बीड, 12 डिसेंबर : महापुरुषांबद्दल बोलणं आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. पण त्यांच्यामधून प्रेरणा घेऊन बोलायचं असतं. जर एखादा व्यक्ती चांगल्या भावनेनं बोलतो, पण जर एखादा शब्द खाली वर झाला तर त्याची आपण वाट पाहतो, आणि त्यावरून बोभाटा करतो हा सुद्धा महापुरुषांचा अवमान करणेच आहे. त्या व्यक्तीच्या भावना पोहोचल्याच नाही, हा सुद्धा महापुरुषांचा अवमान आहे’असं वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी स्मृती स्थळावर पंकजा मुंडे यांनी मौन सोडलं. खासदार डॉ. प्रीतम मुंडे, मातोश्री प्रज्ञा मुंडे यांची यावेळी उपस्थिती होती. दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. (Anil Deshmukh : परमबीर सिंगांचा फुसका ‘बार’, कोर्टात झाली पोलखोल, देशमुखांचे वकील म्हणाले…) ‘टाळ वाजवण्यासाठी नियम आहे. तसे राज्य आणि देश चालवण्यासाठी नियम आहेत. मीडियासाठी सत्ताधारीसाठी पण नियम आहेत. महापुरुषांबद्दल बोलणं आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. पण त्यांच्यामधून प्रेरणा घेऊन बोलायचं असतं. जर एखादा व्यक्ती चांगल्या भावनेनं बोलतो, पण जर एखादा शब्द खाली वर झाला तर त्याची आपण वाट पाहतो, आणि त्यावरून बोभाटा करतो हा सुद्धा महापुरुषांचा अवमान करणेच आहे. त्या व्यक्तीच्या भावना पोहोचल्याच नाही, हा सुद्धा महापुरुषांचा अवमान आहे. आम्ही छत्रपती शिवराय यांचे आम्ही मावळे आहोत. स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या त्यागाचे अधिकाराचे मोजमाप करण्याचा अधिकार आपल्याला नाही. पण आत शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आजचे चित्र पाहुन मन खिन्न होतं. संघर्षाचा सन्मान करता येत नसेल तर थटा करू नका, असा सल्लाही पंकजा मुंडेंनी दिला. ‘कुणी काही बोललं तर त्याचं मी समर्थन करणार नाही. पण जर त्याच्या बोलण्याची वाट पाहून राजकारण करणारे असतील ते मात्र अंतर्मुख करणारे आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. ‘गेल्या काही महिन्यामध्ये मौन बाळगलं, हे एका व्यक्तीच्या विरोधात नाही तर त्या प्रवृत्तीच्या विरोधात होते. आज मुंडे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मौन बाळगलं. नेता तो जिथे कोणी बोलत नाही तिथे बोलणार नेता सगळे बडबड करता तेव्हा शांत राहणारा खरा नेता असतो. राजकारणात संयम लागतो तो माझ्याकडे आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाला. (‘त्या’ विधानाबाबत राज्यपालांकडून माफी नाहीच! अमित शहांना पत्र लिहून दिले स्पष्टीकरण, म्हणाले…) माझा बाप मेला, बाबा जिवंत नाही हे सकाळी कळालं. त्या दिवशी आईने बाबांचे कपडे इस्त्री करून ठेवले होते, त्यांची येण्याची वाट पाहत होतो. पण अचानक अभद्र फोन आला. ज्या ठिकाणी आपण बोलतोय त्याच ठिकाणी त्यांना मुखाग्नी दिला. त्यावेळी आपलं रडणं थांबवण्यासाठी माईक तुम्ही हातात दिला, ज्यावेळी राजकारणामध्ये कुणी नाही असं म्हणून बाबांनी माझ्याकडे जबाबादारी दिली. दिल्लीत अकबर रोडवून गेले, त्यावेळी आक्रोशही करता आला नाही, मुंडे साहेबांनी संस्कार दिल्यामुळे राजकारणात बळ मिळालं, असं म्हणत पंकजा मुंडे भावुक झाल्या. गोपीनाथ गड गावागावात घेवून जा असे आव्हान केले आणि लोकांनी एकले. आतापर्यंत कधीच अभद्र बोलले नाही कोणा विषयी नाही. शत्रू विषयी नाही. मला खूप घाबरतात सगळे, दरारा आहे. प्रेम करता म्हणून लोक तत्व मोडीत काढतात तेव्हा मला राग येतो. मला काही तरी मिळवायचं म्हणून मी कुणासमोर जाणार नाही. मला जे मिळवायाचं ते मी मिळवलं. मला जिथे जायचं तिथे तुम्ही या, हे मी राजकारणात मिळवलं. मी थकणार नाही. मी थांबणार नाही. कोणासमोर कधी झुकणार नाही. काही लोक पदासाठी लोकांच्या पुढे-पुढे करतात. पण माझ्या रक्तात ते नाही. कालही नव्हतं आजही नाही, मी ऊतणार नाही. मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, असंही पंकजा म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.