बीड 28 नोव्हेंबर : बीड जिल्ह्यातून दोन दिवसांपूर्वीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात शेतीच्या जुन्या वादातून पुतण्यानेच वयोवृद्ध चुलता, चुलतीवर कोयत्याने हल्ला केला. यात चुलत्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान पोलीस या प्रकरणातील आरोपीला पकडून घेऊन जात असताना आरोपीने भलताच प्रताप केला. आरोपीने चालत्या पोलीस व्हॅनमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे.
रेल्वे प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! हा VIDEO आता पाहिला नाही तर नंतर होईल पश्चाताप
चालत्या व्हॅनमधून पळून जाण्यासाठी आरोपीने पोलीस व्हॅनच्या स्टेअरिंगला झटका दिला. यामुळे पोलीस व्हॅन पलटली. या घटनेत पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख गंभीर जखमी झाले आहेत. आरोपी रोहिदास विठ्ठल निर्मळ याला घटनास्थळी घेऊन जाताना पाटोदा - मांजरसुंबा महामार्गावरील जाधववस्ती येथे ही घटना घडली. जखमी मुस्तफा शेख यांच्यावर बीड शहरातील लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेत पोलीस अधिकाऱ्यासह सात गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे प्रकरण -
या आरोपीने शेतीच्या जुन्या वादातून वयोवृद्ध चुलता, चुलतीवर कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये हे वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले. या घटनेत जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला, तर महिलेवर उपचार सुरू आहेत. बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथे ही घटना घडली . बळीराम मसाजी निर्मळ वय 80 वर्ष आणि केसरबाई बळिराम निर्मळ वय 70 वर्ष असं या दाम्पत्याचं नाव आहे.
...म्हणे प्रेमात अडसर, प्रियकराच्या मदतीने मामाच्याच मुलीचा केला गेम; बीड हादरलं!
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीड तालुक्यातील मुळुकवाडीमध्ये सकाळी सात वाजता बेसावध असलेल्या वृद्ध दाम्पत्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्यात या दाम्पत्याला प्रतिकार करण्याची देखील संधी मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पती-पत्नीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र बळीराम निर्मळ यांना डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केलं. तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या केसरबाई बळिराम निर्मळ यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.