नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : रेल्वे अपघात, रेल्वेत चोरी अशी प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण सध्या सोशल मीडियावर रेल्वेसंबंधित असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो पाहून तुम्हाला झटका बसेल. रेल्वेने प्रवास करताना तुमच्यासोबत असंही काहीतरी घडत असेल याचा कदाचित तुम्ही कधी विचारही केला नसेल. तुमच्या डोळ्यादेखत हे होत असावं आणि तुम्हाला त्याची माहितीही पडत नसेल. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून सावध व्हा.
बरेच लोक रेल्वेने प्रवास करतात. तुम्हीही त्यापैकी एक असाल. तर हा व्हिडीओ पाहायलाच हवा. रेल्वेने प्रवास करायला निघालेली एक व्यक्ती रेल्वे तिकीट काऊंटवर तिकीट काढायला जाते. तिथं रेल्वे कर्मचारी त्या प्रवाशासोबत जे करतो ते धक्कादायक आहे. प्रवाशानेच हा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू सकता एक व्यक्ती तिकीट काऊंटवर तिकीट खरेदी करायला येते. त्या व्यक्तीच्या हातात 500 रुपयांची नोट आहे. ही व्यक्ती तिकीट देणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याकडे तिकीट मागते. रेल्वे कर्मचारी त्या व्यक्तीला 125 रुपये तिकीट असल्याचं सांगते आणि आपल्या हातातील 20 रुपयाची नोट दाखवते. म्हणजे प्रवाशाने आपल्याला 20 रुपये दिले आणि तिकीट 125 रुपये असल्याचं सांगून ती तिकीट मागते.
हे वाचा - बापरे! आवाजाने पोलिसाचाही टाईट झाली हवा; VIDEO नीट ऐकून तुम्ही सांगा तो कुणाचा?
पण तुम्ही या व्हिडीओत जेव्हा सुरुवातीला पाहिलं तेव्हा प्रवाशाने 500 रुपयाची नोट दिल्याचं स्पष्टपणे दिसतं. मग रेल्वे कर्मचाऱ्याच्या हातात जाताच ही नोट 20 रुपयांची कशी झाली? सुरुवातीला व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही गोंधळाल.
पण व्हिडीओ नीट पाहा. जसा प्रवासी त्या कर्मचाऱ्याला 500 ची नोट देतो. तसा कर्मचारी त्याला कुठे जायचं आहे हे पुन्हा पुन्हा विचारतो. त्याला बोलण्यात गुंतवतो. ज्या हातात नोट आहे तो हात डेस्कवरच असतो. पण त्याचवेळी त्याच्या दुसऱ्या हाताची हालचाल सुरू आहे. हळूहळू हातात पैसे असलेल्या हाताजवळ तो हात आणतो आणि अगदी कुणालाही समजणार नाही अशी तो नोट बदलतो. त्यानंतर तिकीटीचे दर प्रवाशाला सांगून हातातली 20 रुपयाची नोट दाखवतो.
हे वाचा - सतत TV पाहतो म्हणून पालकांनी मुलाला दिली अशी विचित्र शिक्षा; नेटिझन्सचा झाला संताप
रेल्वे कर्मचारी प्रवाशाला बोलण्यात गुंतवून हात की सफाईही करतो. अगदी हुशारीने त्याने 500 रुपयाची नोट 20 रुपयाची केली आहे आणि आणखी 125 रुपये प्रवाशाकडे मागतो आहे. प्रवाशाने रेल्वे कर्मचाऱ्याचा हा प्रताप आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
#Nizamuddin station booking office Date 22.11.22 Rs 500 converted into Rs 20 by the booking clerk.@GM_NRly @RailwayNorthern @drm_dli @RailMinIndia @AshwiniVaishnaw @IR_CRB @RailSamachar @VijaiShanker5 @PRYJ_Bureau @kkgauba @tnmishra111 @AmitJaitly5 pic.twitter.com/SH1xFOacxf
— RAILWHISPERS (@Railwhispers) November 24, 2022
@Railwhispers ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरील ही घटना आहे. पण अशी फसवणूक तुमचीही होऊ शकतं. त्यामुळे सावध राहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, Indian railway, Railway, Train, Viral, Viral videos