मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोनाविरुद्ध लढा: अजित पवार यांच्या सुचनेनंतर बारामतीत घेतला मोठा निर्णय, मध्यरात्रीनंतर..

कोरोनाविरुद्ध लढा: अजित पवार यांच्या सुचनेनंतर बारामतीत घेतला मोठा निर्णय, मध्यरात्रीनंतर..

कोरोनाबाधित रुग्ण शहरात, ज्यापरिसरात आढळून आले आहेत. त्या भागातील सर्वांच्या किमान तीनदा तपासण्या होणार आहेत.

कोरोनाबाधित रुग्ण शहरात, ज्यापरिसरात आढळून आले आहेत. त्या भागातील सर्वांच्या किमान तीनदा तपासण्या होणार आहेत.

कोरोनाबाधित रुग्ण शहरात, ज्यापरिसरात आढळून आले आहेत. त्या भागातील सर्वांच्या किमान तीनदा तपासण्या होणार आहेत.

बारामती, 9 एप्रिल: बारामती शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना मुक्तीसाठी भिलवाडा पॅटर्ननुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामतीत कामकाज करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात झाला. बारामती शहर आणि तालुका गुरुवारी मध्यरात्रीनंतर पूर्णपणे सील करण्यात येणार आहे. बारामती शहरातच बाहेरून येणारे सर्व रस्ते अत्यावश्यक सेवांची वाहने वगळून इतरांसाठी सील करण्यात आले आहे.

हेही वाचा...डॉक्टरनं शोधली भन्नाट !dea , एकाच व्हेंटिलेटरवरून 8 रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा

कोरोनाचा संसर्ग तालुक्यात पसरू नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. सुनील दराडे, डॉ. सदानंद काळे यांची बैठक झाली.

दरम्यान, शहरात कोरोनामुळे एका भाजीविक्रेत्याचा मृत्यू झाला. शहरात तीन दिवसांपासून भाजीपाला मार्केट, मटन मार्केट, मासळी मार्केट बंद करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. तरी देखील नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. हा संसर्ग आणखी वाढू नये म्हणून प्रशासन सर्व पद्धतीने प्रयत्न करीत आहे. परंतु याची कडक अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने आज मध्यरात्रीपासून बारामती शहर व तालुक्याच्या परिसरात फिरताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा.. बोटीवर कोरोनाग्रस्त आहे समजताच थेट समुद्रात मारल्या उड्या, VIDEO VIRAL

बारामती शहर व तालुक्यातील होम कोरोटांईन केलेल्या कुठल्याही नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत आता बाहेर जाता येणार नाही. परराज्यातून आलेले तसेच ज्यांना निवारा नाही त्यांना सांस्कृतिक केंद्रात नेऊन त्यांची राहण्याची, जेवणाची सोय करण्याबाबत निर्णय झाला. कुठल्याही कारणास्तव मुलांनी रस्त्यावर क्रिकेट खेळण्यासह घराबाहेर पडण्यासही आता सक्त मनाई केली जाणार आहे. शहरातून वाहणाऱ्या नीरा डावा कालव्यावर पोहोण्यासाठी जाणाऱ्या मुलांवर देखील आता कारवाईला सामोरे जावे लागेल.

एखाद्या कुटुंबातं अंत्यविधी करतानाही गर्दी होणार नाही. याची काळजी घेऊन कमीत कमी लोकांत अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडावी. शहरात विविध बँकांचे एटीएमच्या ठिकाणी सॅनेटायझर्सचा वापरही आता अनिवार्य केला जाणार आहे. बँकात गर्दी होणार नाही. याबाबत बँकेने गर्दी कमी होईल, याचे नियोजन करावे.

पोलिसांकडून देण्यात आलेले अत्यावश्यक सुविधां पुरविण्यासाठी देण्यात आलेल्या पासेसचाही फेरआढावा घेतला जाणार असून अनावश्यक पासेस यातून रद्द केले जाणार आहेत. नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये या साठी सर्व परीने नियोजन केले जात आहे.

हेही वाचा...महिला पोलिसाच ममत्व आलं धावून, महिलेची जिप्सीमध्ये केली प्रसूती

नागरीकांनी औषधे, अन्नधान्य, दूध व जीवनाश्यक वस्तूंसाठी, घराबाहेर पडण्यापेक्षा ती घरपोच कशी देता येईल, या दृष्टीनेही प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. नगरपालिका क्षेत्रात, प्रत्येक वॉर्डनिहाय दुकानांची नावे व त्यानुसार जबाबदारीचे वाटप केले जाणार आहे.

कोरोनाबाधित रुग्ण शहरात, ज्यापरिसरात आढळून आले आहेत. त्या भागातील सर्वांच्या किमान तीनदा तपासण्या होणार आहेत. अरोग्य विभागाची 161 व 89 पथके कार्यरत आहेत, त्यांच्या मार्फत या तपासण्या होतील. नागरीकांना स्वस्त धान्य दुकानातून सर्वांना तीन महिन्यांचे धान्य पुरविण्याचेही नियोजन या बैठकीत करण्यात आले . याचे समन्वय बारामतीचे तहसिलदार विजय पाटील करणार आहेत.

संपादन- संदीप पारोळेकर

First published:

Tags: Ajit pawar, Baramati, Corona, Pune news, Symptoms of coronavirus