नागपूर, 9 एप्रिल: राज्यात कोरोनाबाधित रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. अशा परिस्थितीत राज्यात व्हेंटिलेटरची कमतरता भासू शकते. यावर नागपुरचे हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ.आनंद संचेती व त्यांच्या सहकाऱ्यांनी भन्नाट आयडिया शोधून काढला आहे.
डॉ.संचेती यांनी व्हेंटिलेटरला लावण्यात येणार स्पिल्टर विकसित केले आहे. ज्यामुळे एकाच व्हेंटिलेटरवर एकाच वेळी 8 रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. भारतात सध्याच्या घडीला विविध रुग्णालयात 50 हजारांवर व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढल्यास गंभीर परिस्थितीत रुग्णांना व्हेंटिलेटर आवश्यक आहे.
#Coronavirus वर नागपुरच्या या डॉक्टरनं शोधली भन्नाट !dea... VIDEO पाहाच... pic.twitter.com/5qVd2s1keM
— News18Lokmat (@News18lokmat) April 9, 2020
हेही वाचा.. CoronaVirus चा धोका : होम डिलिव्हरी घेताना काय काळजी घ्याल?
सरकारने व्हेंटिलेटर निर्मितीच्या सूचना दिल्या आहेत. परंतु कमी वेळेत मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर तयार करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत जे व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, त्याच व्हेंटिलेटरवर एकाच वेळी 8 गंभीर रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. सध्या वापरात असणाऱ्या व्हेंटिलेटरला एक स्प्लिटर बसवून ऑक्सिजनचा पुरवठा 8 भागात विभाजित करण्यात आला आहे. स्प्लिटरमधून 8 रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. विशेष म्हणजे, दूषित हवा बाहेर निघणाऱ्या नळीला एक फिल्टर लावण्यात आले आहे. ज्यामुळे रुग्ण बाहेर सोडत असलेला श्वासाचा संसर्ग इतरांना होत नाही.
हेही वाचा.. यवतमाळ जिल्ह्यात 8 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, 7 जणांचे 'तबलिगी' कनेक्शन
तज्ज्ञांच्या उपस्थितीत या व्हेंटिलेटरची चाचणी करण्यात आली आहे. देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास या व्हेंटिलेटर प्रयोगाच्या माध्यमातून दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचे डॉ.आनंद संचेती यांनी सांगितले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होत असून आता कोरोना रुग्णांची संख्या 1297 एवढी झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे राजधानी मुंबईत अवघ्या 12 तासांत 143 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा..महिलांपेक्षा पुरुष coronavirus चे सर्वाधिक शिकार, डॉक्टरांनी दिली 'ही' कारणं
पुणे, औरंगाबाद येथे प्रत्येकी 3, कल्याण डोंबिवलीध्येही 4 रुग्णांची वाढ झाली आहे. तर मीरा-भाईंदर, वसई-विरार, सिंधुदुर्ग, ठाणे, यवतमाळ या भागात प्रत्येकी एक असे एकूण 162 रुग्ण 12 तासांत वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता एकूण 1297 झाला आहे.
संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus