जकार्ता, 09 एप्रिल : कोरोनाची प्रचंड दहशत लोकांच्या मनामध्ये आहे. ही भीती लोकांना काय करायला भाग पाडू शकते याची कल्पनाही करता येणार नाही. इंडोनेशियात समुद्रात अशीच एक चक्रावून टाकणारी घटना घडली. एक बोट 255 पर्यटकांसह समुद्रात गेली होती. तेव्हा काही लोकांनी बोटीत कोरोनाग्रस्त असल्याचं समजल्यानं समुद्रात उड्या मारल्या. डेली मेलनं हे वृत्त दिलं असून एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे.
समुद्रात लोकांनी उड्या मारल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यामध्ये लोक बोटीतून समुद्रात उड्या मारताना दिसत आहेत. बोटीत 255 प्रवाशी होते. बोर्नियोहून सुलावेसीकडे ही बोट जात होती. मात्र सुलावेसी प्रशासनाने कोरोनामुळे बोटीवरील लोकांना बंदरात उतरण्यास परवानगी नाकारली.
दरम्यान, बोटीवर कोरोनाग्रस्त असल्याची अफवा पसरली. हे ऐकताच काही लोकांनी समुद्रात उड्या मारल्या. त्यांना वाचवण्यासाठी लगेच लाइफ जॅकेट टाकण्यात आली. या प्रकारानंतर इंडोनेशियाच्या प्रशासनाने बोटीला बंदरात थांबवण्यास परवानगी दिली.
Dear @pelni162 hari ini (07/04/2020) beredar video KM. Lambelu tidak dapat sandar di Dermaga Laurens Say, Maumere-NTT diduga karena larangan sandar oleh Pemkab Sikka-NTT dlm rangka pencegahan Covid19 dan terjadi kepanikan di atas kapal.#WhatsApp #CoronaVirusUpdate pic.twitter.com/Qp7ATFTesk
— Debt Collector (@MrBekalicky89) April 7, 2020
पाण्यात उड्या मारलेले लोक पोहोचतच समुद्राच्या किनाऱ्यावर आले. यानंतर इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाकडून सांगण्यात आलं की, आम्ही लोकांना फक्त कोरोनाची टेस्ट कऱण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलं होतं. इंडोनेशियात कोरोनाचे जवळपास 3 हजार रुग्ण आहेत. तर आतापर्यंत देशात 240 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळेच प्रवास करणाऱ्यांची कडक तपासणी केली जात आहे.
हे वाचा : लॉकडाऊनमध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी खेळला गरबा, VIDEO VIRAL
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus