औरंगाबाद, 30 जानेवारी : औरंगाबाद शहर हे आशिया खंडात सर्वात वेगाने विकसित होणारे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. औरंगाबादमध्ये वाळूज एमआयडीसी, चिकलठाणा एमआयडीसी, रेल्वे स्टेशन एमआयडीसी आणि शेंद्रा एमआयडीसी अशा महत्त्वाच्या एमआयडीसी आहेत. या ठिकाणी हजारो लहान-मोठे उद्योग आहेत. मात्र, कोरोनामुळे येथील उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फटका बसला. कोरोनामध्ये अनेकांना उद्योग बंद करावे लागले. पण कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर परत काही उद्योग सुरु झाले आहेत. या उद्योगांना आगामी आर्थिक बजेटमध्ये कोणकोणत्या अपेक्षा आहेत याची माहिती सीएमआयचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी दिली आहे.
या आहेत अपेक्षा
1) मध्यम वर्गीय व्यक्तींसाठी जो इन्कम टॅक्सचा बॅरिकेट आहे त्यात सुधारणा आवश्यक आहे. यात नागरिकांना अधिकाधिक सूट द्यावी. याचा फायदा असा होईल की नागरिकांची खरेदीची ताकत वाढेल आणि खरेदी अधिक करतील. याचा लाभ उद्योगांना होईल.
2) देशात जीएसटीचे नॅशनलायझेशन होणं गरजेचं आहे. यात ऑटो मोटिव, हॉटेल, लगझरी इत्यादींना मोठा जीएसटी लावण्यात आलेला आहे. यामध्ये नॅशनल नॅशनलायझेशन करून जीएसटी कमी केला तर खर्च करण्याची प्रवृत्ती वाढेल. यामधून उद्योगांची वाढ होईल.
Union Budget 2023 : औरंगाबादच्या रेल्वे प्रवाशांना बजेटपासून काय हवं? पाहा Video
3) औरंगाबाद जालना औद्योगिक शहरांसाठी मनमाड ते नांदेड रेल्वेच्या विद्युतीकरण करण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. रेल्वेचे दुहेरी करणं करणे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी बजेटमध्ये भरघोस तरतूद करणे अपेक्षित आहे.
4) औरंगाबादची महत्त्वाच्या शहरासोबत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज आहे. सोलापूर, धुळे महामार्गाच काम जवळपास पूर्ण होत आलेले आहे. मात्र, यात चाळीसगाव घाटातील कामासाठी अधिकचं बजेट आवश्यक आहे.
5) औरंगाबाद शहराला 10 हजार एकराचे डीएमआयसी आहे. सेव्हन स्टार इंडस्ट्रियल शहर आहे. शहरासाठी इंटरनॅशनल कनवेंशन सेंटर बाबत चर्चा झाली होती. यासाठी सरकारने बजेट मधून तरतूद करावी.
Union Budget 2023 : बजेटनंतर सोन्याचे भाव कमी होणार की वाढणार? पाहा Video
उद्योग क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध
रशिया, युक्रेन युद्धामुळे युरोप स्लो डाऊन होत आहे. आय टी क्षेत्रातील चढ उतारामुळे अमेरिका स्लो डाऊन होत आहे. कोरोनामुळे चीन स्लो डाऊन झाला आहे. यामुळे भारताला उद्योग क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध झाल्या आहेत, असंही मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Local18, Union budget