मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिवसेनेच्या आठवणीने शिंदे गटाचे खास मंत्री भावुक, दिली भावनिक साद

शिवसेनेच्या आठवणीने शिंदे गटाचे खास मंत्री भावुक, दिली भावनिक साद

 शिंदे गटाने शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं. एवढंच नाहीतर...

शिंदे गटाने शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं. एवढंच नाहीतर...

शिंदे गटाने शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं. एवढंच नाहीतर...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad Cantonment, India

अविनाश कानडजे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 06 फेब्रुवारी : 'आमच्यामध्ये आज वेगवेगळी मतं आहे, आमच्यात मतभेद असतील पण मनभेद नाही. मी नेहमी जुन्या आमदारांशी बोलतो, ते आमच्याशी बोलता' असं म्हणत बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांनी जाहीरपणे कबुली दिली.

शिंदे गटाने शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं. एवढंच नाहीतर पक्षचिन्ह आणि नावावरूनही दोन्ही गट कोर्टामध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. पण, आता संजय राठोड यांनी शिवसेनेला साद घातली आहे.

('हिला डाला ना' आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला फिल्मी स्टाईल टोला, म्हणाले...)

''आमच्यामध्ये आज वेगवेगळी मतं आहे, आमच्यात मतभेद असतील पण मनभेद नाही. मी नेहमी जुन्या आमदारांशी बोलतो, ते आमच्याशी बोलता. आम्ही खांद्याला खांदा देऊन काम केलं आहे. खूप वर्ष एकत्र काम केले आहे. ती लोकं सुद्धा बाळासाहेबांचा विचार घेऊन एकत्र आली, आम्ही सुद्धा त्यातलेच आहोत' असं म्हणत संजय राठोड यांनी आम्ही एकच असल्याचे बोलून दाखवलं.

तसंच, 'आज आम्ही उठाव केला, पण आम्ही इथं बाळासाहेबांच्या विचारानेच इथं काम करतोय. ते ही बाळासाहेबांच्या विचारांनी चालतात. त्यामुळे आमचे मित्रत्वाचे नाते आहे' असंही राठोड म्हणाले.

(चिंचवडमध्ये मविआचा उमेदवार ठरेना, राहिला फक्त एकच दिवस, इच्छुक गॅसवर)

नवीन सरकार येण्याआधी एकनाथ शिंदे गटामध्ये काही आमदार सामील झाले. पण ठाकरे गटांमध्ये बहुतांश आमदार आहेत आम्ही अजूनही एकमेकांच्या संपर्कात आहोत,राजकीय संबंध वेगळे असले तरी जुनी मैत्री आमची कायम आहे', असंही संजय राठोड यांनी म्हणाले.

First published:

Tags: Shivsena