औरंगाबाद, 10 डिसेंबर : राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुका (upcoming Municipal corporation elections) लक्षात घेता सर्वच पक्षांकडून मोट बांधायला सुरुवात केली आहे. त्यासाठी राजकीय नेत्यांचे दौरेही सुरू झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे सुद्धा महाराष्ट्रातील विविध भागांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात औरंगाबादचाही समावेश आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यापूर्वी शिवसेनेने (Shiv Sena) मनसेला एक धक्का दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुढील आठवड्यात औरंगाबादचा दौरा करणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच शिवसेनेने मनसेला धक्का दिला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई हे औरंगाबाद दौऱ्यावर असताना मनसेतील स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्याने मनसेला हा एक मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
वाचा : ठाकरे सरकारमधील मंत्र्याच्या भावाची भाईगिरी, तरुणाला मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद
औरंगाबाद मनपाच्या निवडणुका काही दिवसांवर आहेत. या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने खेळी खेळत मनसे पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना गळाला लावले आहे. त्यामुळे याचा परिणाम मनसेच्या मतांवर होईल असं बोललं जात आहे. आता आगामी काळात हे कळेल की शिवसेनेने खेळलेली ही खेळी किती यशस्वी ठरते.
वाचा : "देवेंद्र फडणवीस काकांकडून मला हॅप्पी बर्थडेचा फोन करणार असाल तरच बैठकीला जा"
मनसेची बैठक
काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यसोबतच इतरही पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील महापालिका, नगरपंचायत किंवा नगर परिषदेच्या निवडणुका असो या निवडणुकींविषयी बैठकीत चर्चा झाली. राज ठाकरे यांचा दौरा कधीपासून सुरुवात करायची या विषयावर चर्चा झाली होती.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांचा दौरा 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पुण्यात 6 डिसेंबरपासून दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 डिसेंबरपासून राज ठाकरे मराठवाड्याचा दौरा करतील आणि मग पुन्हा 16 जिसेंबर रोजी पुण्यात राज ठाकरे एक बैठक घेणार आहेत. अयोध्येत देखील राज ठाकरे दौरा करणार आहे मात्र अद्याप अयोध्या दौराची तारीख ठरली नाही.
16 डिसेंबरला पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेते, निवडून आले माजी नगरसेवक तसेच आताचे नगरसेवक यांची सगळ्यांची बैठक आहे. आता दोन बैठकांची तारीख ठरलेली आहे. राज ठाकरे राज्यातील सहा विविध ठिकाणी बैठका घेणार आहेत. आता दोन ठिकाणीच्या तारखा ठरल्या आहेत. त्यानंतर राज ठाकरे कोकणात जातील. पण त्या दौऱ्याची तारीख अद्याप ठरलेली नाही असंही बाळा नांदगावकर म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, MNS, Raj Thackeray, Shiv sena