मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /BJP-MNS युती होणार? बाळा नांदगावकर म्हणाले, "तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल"

BJP-MNS युती होणार? बाळा नांदगावकर म्हणाले, "तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल"

. मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये मनसे पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत सोबत घ्यावं का? या भोवतीचा मुद्दा चर्चेला आला पण

. मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये मनसे पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत सोबत घ्यावं का? या भोवतीचा मुद्दा चर्चेला आला पण

Bala Nandgaonkar on MNS-BJP yuti: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे-भाजप युतीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तुषार रूपनवर, प्रतिनिधी

मुंबई, 3 डिसेंबर : आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांपूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (MNS Chief Raj Thackeray) निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि इतरही नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी मनसे-भाजप युतीवर भाष्य केलं आहे. (Bala Nandgaonkar reaction on MNS-BJP yuti)

आगामी निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजपची युती होणार का? या प्रश्नावर बाळा नांदगावकर म्हणाले, एकला चलो यामधून आम्ही निवडणूका लढवल्या आहेत. मात्र तुर्तास तरी भाजपा सोबत युती बाबत कोणतीही चर्चा नाही. बाळा नांदगावकर यांनी ही प्रतिक्रिया दिल्यानंतर 'तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल' असे विधान केले आहे त्यामुळे युती होण्याचे हे संकेत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांचा दौरा 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पुण्यात 6 डिसेंबरपासून दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 डिसेंबरपासून राज ठाकरे मराठवाड्याचा दौरा करतील आणि मग पुन्हा 16 जिसेंबर रोजी पुण्यात राज ठाकरे एक बैठक घेणार आहेत. अयोध्येत देखील राज ठाकरे दौरा करणार आहे मात्र अद्याप अयोध्या दौराची तारीख ठरली नाही.

16 डिसेंबरला पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेते, निवडून आले माजी नगरसेवक तसेच आताचे नगरसेवक यांची सगळ्यांची बैठक आहे. आता दोन बैठकांची तारीख ठरलेली आहे. राज ठाकरे राज्यातील सहा विविध ठिकाणी बैठका घेणार आहेत. आता दोन ठिकाणीच्या तारखा ठरल्या आहेत. त्यानंतर राज ठाकरे कोकणात जातील. पण त्या दौऱ्याची तारीख अद्याप ठरलेली नाही असंही बाळा नांदगावकर म्हणाले.

वाचा : राज ठाकरे पुन्हा एकदा सज्ज, महाराष्ट्र दौरा करणार

राज ठाकरे - देवेंद्र फडणवीस भेट

गेल्या महिन्यात 24 नोव्हेंबर रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अमृता देवेंद्र फडणवीस, शर्मिला राज ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सपत्नीक नवीन घरी जेवायला बोलावले होते. हे निमंत्रण स्वीकारून फडणवीस त्यांच्याकडे जेवायला गेले होते. दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, ही एक कौटुंबिक भेट असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

दिवाळी पाडव्याच्या दिवशी भाजप नेते आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या घरी आले होते. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यातील मैत्रीबद्दल सर्वांनाच माहित आहे. दरवर्षी आशिष शेलार राज ठाकरेंना भेटण्यासाठी कृष्णकुंजवर येत असतात. दिवाळी पाडव्याच्या दिवशी आशिष शेलार सकाळीच कृष्णकुंजवर पोहोचले. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये भेट झाली. दिवाळी फराळ घेत दोघांनीही गप्पा मारल्याची माहिती समोर आली होती. आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना या भेटीदरम्यान एक पुस्तकही भेट दिलं होतं. यासोबतच भाजप नेते प्रसाद लाड यांनीही नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

First published:

Tags: BJP, MNS, Raj Thackeray