वाचा : 'पवारांच्या साथीने ममता दीदी काँग्रेसला बाजू ठेवून सत्तेची मोट बांधतायत', फडणवीसांनी साधला निशाणा मुलीने ठेवलेली ही अट पूर्ण करण्याचं आश्वासन केदार साठे यांनी दिले आणि ते बैठकीला निघाले. बैठक पार पडल्यावर केदार साठे यांनी हा प्रकार देवेंद्र फडणवीस यांना सांगितला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही केदार साठे यांच्या मुलीचा हट्ट पुरवण्याचा निर्णय घेतला आणि तिला थेट व्हिडीओ कॉल केला. हॅप्पी बर्थडे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं त्यावर केदार यांच्या मुलीने थँक्यू म्हटलं. तसेच माजी उद्यापासून शाळा सुरू होत आहे. मी शाळेत जाणार आहे. शाळा सुरू व्हायला हवी असे मला वाटतं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी तिला गुड गर्ल असं म्हटलं. यावेळी केदार यांच्या मुलीने देवेंद्र फडणवीस यांना गुलाबजाम खाण्याचं आमंत्रण ही दिलं.पण, आज त्यांच्या मुलीचा,प्रचितीचा वाढदिवस असल्याने तिने बाबांना बैठकीला जाऊ नका, असा हट्ट केला. पक्षाची बैठक महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यांनी मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण,प्रचितीनेही वेगळाच हट्ट केला.जर देवेंद्र फडणवीस काका मला शुभेच्छा देणार असतील,तरच मी परवानगी देईन.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 2, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Dapoli, Devendra Fadnavis