Home /News /maharashtra /

शिवसेनेतील बंडखोरांसोबत त्यांच्या बायका देखील राहणार नाहीत, संतापलेल्या शिवसेना आमदाराचं वक्तव्य

शिवसेनेतील बंडखोरांसोबत त्यांच्या बायका देखील राहणार नाहीत, संतापलेल्या शिवसेना आमदाराचं वक्तव्य

शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या बदमाषांचा आता भरवसा राहिला नाही. या बंडखोर आमदारांच्या बायका देखील त्यांना सोडून जातील, त्यांच्यासोबत राहणार नाहीत, असं शिवसेना आमदार संजय बांगर यांनी म्हटलं आहे.

>> मनीष खरात, प्रतिनिधी हिंगोली, 26 जून : शिवसेनेतील बंडखोर आमदांरांमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना पक्ष धोक्यात आला आहे. शिवसेना कार्यकर्ते यामुळे नाराज आहेत. काल अनेक ठिकाणी संतापलेल्या शिवसैनिकांचा संतापाचा बांध फुटलेला दिसला. बंडखोर आमदारांच्या ऑफिसेसची अनेक ठिकाणी तोडफोड झाल्याचं दिसून आलं. आता हिंगोलीतील शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांना उद्देशून भलताच संताप व्यक्त केलाय. शिवसेनेतील बंडखोरांसोबत त्यांच्या बायका देखील राहणार नाहीत, असं वक्तव्य बांगर यांनी केलं. हिंगोलीच्या वसमत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात शिवसेनेच्यावतीने आज शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार संतोष बांगर यांनी हे वक्तव्य केले आहे. शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या बदमाषांचा आता भरवसा राहिला नाही. या बंडखोर आमदारांच्या बायका देखील त्यांना सोडून जातील, त्यांच्यासोबत राहणार नाहीत. त्यांची मुलं मुंजेच मरतील, त्यांची लग्न होणार नाहीत. अशा बेईमानांच्या मुलांना कोण मुली देणार? असं वक्तव्य शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केलं. आपल्या जिल्ह्यात तर कोणी नाही परंतु ज्या जिल्ह्यात ते बंडखोर आहेत, तेथे जाऊन वचपा काढा, त्यांना तुडवून काढा, असं चिथावणीखोर आवाहन देखील आमदार संतोष बांगर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. बंडखोरांना पळवून पळवून मारेन असा इशारा देखील त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिला. मुख्यमंत्र्यांकडून CM पदाची ऑफर, आदित्य यांचं आक्रमक भाषण; पक्ष वाचवण्यासाठी आता रश्मी ठाकरेंकडूनही प्रयत्न सुरू... शिवसेनेतील (Shivsena) तब्बल 40 बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली तरीदेखील ते मुंबईत येण्यास तयार नसल्याचं दिसत आहे. सध्या शिवसेनेपुढे सत्ता आणि पक्ष कसा टिकवून ठेवायचा याबाबतचा प्रश्न आ वासून उभा आहे. राज्यपाल लागले कामाला, एकनाथ शिंदे गटासाठी पोलीस आयुक्तांना लिहिले पत्र उदय सामंत एकनाथ शिंदेंच्या गटात सामील दरम्यान, कालपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे शिवसेनेचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत गुवाहाटीला पोहोचले आहे.  उदय सामंत नॉट रिचेबल आहेत. उदय सामंत हेदेखील शिंदे गटात सामील झालं असल्याचं सांगितलं जात आहे. सुरतहून विशेष विमानाने उदय सामंत गुवाहाटीला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Published by:Pravin Wakchoure
First published:

Tags: Eknath Shinde, Shivsena

पुढील बातम्या