Home /News /mumbai /

मुख्यमंत्र्यांकडून CM पदाची ऑफर, आदित्य यांचं आक्रमक भाषण; पक्ष वाचवण्यासाठी आता रश्मी ठाकरेंकडूनही प्रयत्न सुरू...

मुख्यमंत्र्यांकडून CM पदाची ऑफर, आदित्य यांचं आक्रमक भाषण; पक्ष वाचवण्यासाठी आता रश्मी ठाकरेंकडूनही प्रयत्न सुरू...

गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे कुटुंब आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

    मुंबई, 26 जून : गेल्या सहा दिवसांपासून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. शिवसेनेतील (Shivsena) तब्बल 40 बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली तरीदेखील ते मुंबईत येण्यास तयार नसल्याचं दिसत आहे. सध्या शिवसेनेपुढे सत्ता आणि पक्ष कसा टिकवून ठेवायचा याबाबतचा प्रश्न आ वासून उभा आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबीय तीव्रपणे टीका करीत असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत शांत असलेले आदित्य ठाकरेदेखील कालपासून एकनाश शिंदेंसह बंडखोर आमदारांवर टीका करीत आहे. दरम्यान आता रश्मी ठाकरे यादेखील मैदानात उतरल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रश्मी ठाकरे या बंडखोर आमदारांच्या पत्नीशी (Rashmi Thackeray is also trying to save the party ) संवाद साधत आहेत. त्यांनी आमदारांची समजूत घालावी आणि परत मुंबई यावं, असं आवाहन करीत आहे. आतापर्यंत त्यांनी 6 ते 8 बंडखोर आमदारांच्या पत्नीशी संपर्क केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र काही आमदारांच्या पत्नींनी उलटपक्षी रश्मी ठाकरेंनाच सुनावल्याचं सांगितलं जात आहे. उलटपक्षी आमदारांच्या पत्नीच त्यांच्या पतीवर कसा अन्याय झाला, हे सांगत आहे. त्यामुळे रश्मी ठाकरेंचा हा प्रयत्न फोल ठरला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रश्मी ठाकरे या कायम उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभ्या असतात. पडद्याच्या मागून त्या पक्षातील सूत्र हाताळत असल्याचीही चर्चा असते. आता पक्षावरच संकट आल्यामुळे रश्मी ठाकरेंकडून प्रयत्न केले जात आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या