Home /News /mumbai /

राज्यपाल लागले कामाला, एकनाथ शिंदे गटासाठी पोलीस आयुक्तांना लिहिले पत्र

राज्यपाल लागले कामाला, एकनाथ शिंदे गटासाठी पोलीस आयुक्तांना लिहिले पत्र

आता बंडखोर असलेल्या आमदारांना पोलीस संरक्षण द्यावे, असे पत्रच मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) आणि महासंचालकांना लिहिले

आता बंडखोर असलेल्या आमदारांना पोलीस संरक्षण द्यावे, असे पत्रच मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) आणि महासंचालकांना लिहिले

आता बंडखोर असलेल्या आमदारांना पोलीस संरक्षण द्यावे, असे पत्रच मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) आणि महासंचालकांना लिहिले

    मुंबई, 26 जून : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार (mva government) धोक्यात आले आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) कोरोनावर मात करून राजभवनात दाखल झाले आहे. त्यांनीही आता बंडखोर असलेल्या आमदारांना पोलीस संरक्षण द्यावे, असे पत्रच मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) आणि महासंचालकांना लिहिले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.  राज्यपालांनी कोरोनावर आता मात केली आहे. उपचाराअंती आता राज्यपाल कोश्यारी यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर राजभवनात येऊन राज्यपालांनी कामकाज हाती घेतला. राज्यपालांनी मुंबई पोलीस आयुक्त पांडे यांना पत्र लिहिले आहे.  शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा देण्याची मागणी या पत्रातून केली आहे. तसंच याची एक  राज्याचे पोलीस महासंचालक यांनाही लिहिली आहे. त्यामुळे आता राज्यपाल हे आता सक्रिया झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने राज्यपाल यांना सुरक्षेबाबत पत्र लिहून मागणी केली होती. त्यानंतर राज्यपालांनी हे पत्र पाठवले आहे. 15 बंडखोर आमदारांना केंद्राकडून सुरक्षा दरम्यान, शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या घराबाहेर तसंच कार्यालयात तोडफोड आणि दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर केंद्राने या आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. काल शिंदे गटातील 15 आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.  शनिवारी झालेल्या तोडफोडीच्या आणि हिंसक घटनांनंतर केंद्र सरकारने शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या