अविनाश कानडजे, औरंगाबाद 15 ऑगस्ट : शिंदे सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. पण, शिंदे गटातील अनेक इच्छुकांना संधी न मिळाल्यामुळे कमालीचे नाराज आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याचं बोललं जात आहे. नुकतंच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ट्वीट केलं होतं. शिवसेनेवर टीका करणारे संजय शिरसाट अचानक शिवसेनेचं कौतुक करू लागल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता त्यांचं एक बॅनरही चर्चेत आलं आहे.
दिलासा मिळताच समीर वानखेडेंचं मोठं पाऊल; नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या आमदार संजय शिरसाट यांच्या बॅनरवर फक्त संभाजीनगर नाव लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे शिरसाट यांच्या मनात नेमकं चाललंय काय? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. तत्कालीन ठाकरे सरकारने औरंगाबादचं संभाजीनगर नाव केलं होतं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा कॅबिनेट घेऊन या नावात बदल करून छत्रपती संभाजीनगर असं नाव केलं. अशात आता शिरसाट यांच्या बॅनरवर मात्र छत्रपती संभाजीनगर उल्लेख नसून ठाकरे सरकारने केलेल्या संभाजीनगर नावाचा उल्लेख असल्याने पुन्हा त्यांची नाराजी झळकली असल्याचं बोललं जात आहे.
मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याने आपली नाराजी संजय शिरसाट यांनी बोलून दाखवली होती. तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कुटुंब प्रमुख म्हणून केलेल्या उल्लेखाचे ट्विटही चर्चेत आले होते. आता पुन्हा स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर त्यांनी छत्रपती संभाजीनगर उल्लेख न करता फक्त संभाजीनगर असा उल्लेख केला आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय अशा चर्चा औरंगाबादमध्ये रंगल्या आहेत. लक्ष्य शासन नाही तर…‘शिंदे सरकार’चं खातेवाटप जाहीर होताच आदित्य ठाकरेंचा घणाघात शिवसेनेत बंडखोरी करून संजय शिरसाट हे शिंदे गटामध्ये सामील झाले. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संजय सिरसाट यांना संधी मिळेल अशी शक्यता होती पण शिरसाट यांनी संधी मिळाली नाही. त्यामुळे शिरसाट हे कमालीचे नाराज झाले आहेत.