मुंबई 15 ऑगस्ट : जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (NCB) मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना नुकताच दिलासा मिळाला आहे. यानंतर आता नवाब मलिकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात गोरेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्य शासन नाही तर…‘शिंदे सरकार’चं खातेवाटप जाहीर होताच आदित्य ठाकरेंचा घणाघात गोरेगाव पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम 500, 501, अनुसूचित जाती/जमाती कायद्याच्या 3(1) अन्वये नवाब मलिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गोरेगाव विभागाचे एसपी या प्रकरणाची अधिक चौकशी करणार आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. हे आरोप करताना वानखेडे कुटुंबीयांबद्दल काही आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता, असा आरोप करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीकडे चार जणांनी वानखेडेंच्या विरोधात तक्रार केली होती. त्यामध्ये नवाब मलिक यांचाही समावेश होता. कोकणात रिफायनरी प्रकल्प आल्यास…उद्योगमंत्री होताच उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया परंतु, समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून दिलासा मिळाला होता. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचं कुठेही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे हिंदू महार हे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला होता. यानंतर दिलासा मिळताच वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.