जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: औरंगाबादेत विसर्जन मिरवणुकीतही शिंदे विरुद्ध ठाकरे गट; आरतीवरुन राजकीय नाट्य

VIDEO: औरंगाबादेत विसर्जन मिरवणुकीतही शिंदे विरुद्ध ठाकरे गट; आरतीवरुन राजकीय नाट्य

VIDEO: औरंगाबादेत विसर्जन मिरवणुकीतही शिंदे विरुद्ध ठाकरे गट; आरतीवरुन राजकीय नाट्य

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे येण्याच्या अगोदरच महासंघ अध्यक्ष विजय अवताडे यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते आरती केल्याने नाराजी नाट्य पाहायला मिळालं

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद 10 सप्टेंबर : एकनाथ शिंदे यांच्यासह 50 आमदारांच्या बंडानंतर शिंदे आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. मात्र, हे राजकीय नाट्य गणपती विसर्जनावेळीही पाहायला मिळालं.औरंगाबादमध्ये सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा असं मानापमान नाट्य पाहायला मिळालं. औरंगाबाद शहरातील मुख्य गणेश महासंघ गणपतीच्या आरतीवरून नाराजी नाट्य पाहायला मिळालं. यावेळी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी विसर्जन स्थळावरून काढता पाय घेतला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे येण्याच्या अगोदरच महासंघ अध्यक्ष विजय अवताडे यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते आरती केल्याने नाराजी नाट्य पाहायला मिळालं. यानंतर खैरे यांनी याठिकाणहून काढता पाय घेतला तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही कार्यक्रम स्थळावरून निघून गेले. विसर्जन मिरवणुकीवेळी समोरासमोर आले संजय शिरसाट अन् चंद्रकांत खैरे, एकमेकांकडे पाहिलं अन्.., पाहा VIDEO महासंघाची आरती 12 वाजेपूर्वी करण्यात आली. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे पोहोचण्याच्या आधीच आरती झाल्यामुळे ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मागील 28 वर्षात पहिल्यांदाच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या अनुपस्थित संस्थान गणपतीची सार्वजनिक आरती करण्यात आली. त्यामुळे अंबादास दानवे यांना राग अनावर झाला.

जाहिरात

खैरे-शिरसाट समोरासमोर - दरम्यान औरंगाबाद संस्थान गणपती मिरवणुकीत शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाट आलेले होते. याशिवाय सेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरेही याठिकाणी होते. मात्र, सुरुवातीला दोघांनीही एकमेकांकडे दुर्लक्ष केलं. ते एकापाठोपाठ चालत होते. मात्र, दोघांनीही एकमेकांकडे पाहिलंही नाही. अखेर नाराज संजय शिरसाट यांनी विचार बदलला, मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला निघाले इतक्यात भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड सहकार मंत्री अतुल सावे आणि बंडखोर आमदार संजय सिरसाट सोबत चालत असताना सेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना भागवत कराड यांनी मागे ओढलं. यानंतर त्यांनी खैरे यांना संजय सिरसाट यांच्या बाजूला उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र खैरे शिरसाट यांच्या बाजूला उभे राहायला तयार नव्हते. तरीही खैरेंना भागवत यांनी ओढलंच. यानंतर खैरे यांनी शिरसाट यांच्याकडे पाहून हास्य दिलं, यावर सिरसाट यांनीही खैरेंकडे पाहून स्मित हास्य दिलं. मात्र, खैरे लगेचच तिथून निघून गेले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात