औरंगाबाद : आज अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. यामुळे राज्यभरात गणेशाचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने बाप्पाला दणक्यात निरोप देण्यासाठी अनेक ठिकाणी उत्साहात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे. दरम्यान अनेक राजकीय नेतेही आपल्या भागातील विसर्जनाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावताना दिसत आहे. औरंगाबादेत मात्र विसर्जन मिरवणुकीत वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. udayanraje vs shivendraraje : उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचा वाद आता कडेलोटापर्यंत, शिवेंद्रराजेंनी कडेलोट करण्याची केली भाषा यावेळी औरंगाबाद संस्थान गणपती मिरवणुकीत शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाट आलेले होते. याशिवाय सेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरेही याठिकाणी होते. मात्र, सुरुवातीला दोघांनीही एकमेकांकडे दुर्लक्ष केलं. ते एकापाठोपाठ चालत होते. मात्र, दोघांनीही एकमेकांकडे पाहिलंही नाही.
औरंगाबाद संस्थान गणपती मिरवणुकीत शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाट आलेले होते. याशिवाय सेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरेही याठिकाणी होते. पुढे काय घडलं पाहा pic.twitter.com/7RWxLZCnJg
— News18Lokmat (@News18lokmat) September 9, 2022
इतक्यात भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड सहकार मंत्री अतुल सावे आणि बंडखोर आमदार संजय सिरसाट सोबत चालत असताना सेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना भागवत कराड यांनी मागे ओढलं. यानंतर त्यांनी खैरे यांना संजय सिरसाट यांच्या बाजूला उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र खैरे शिरसाट यांच्या बाजूला उभे राहायला तयार नव्हते. तरीही खैरेंना भागवत यांनी ओढलंच. यानंतर खैरे यांनी शिरसाट यांच्याकडे पाहून हास्य दिलं, यावर सिरसाट यांनीही खैरेंकडे पाहून स्मित हास्य दिलं. मात्र, खैरे लगेचच तिथून निघून गेले. अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणाला धक्कादायक वळण; तरुणीचा नवनीत राणांवर गंभीर आरोप काही दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गणोशोत्सवपूर्वी प्रथेप्रमाणे आयोजित समन्वय बैठकीत राजकीय नेत्यांच्या मानपमानाचं नाट्य पाहायला मिळालं होतं. शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा अगोदर सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर उपस्थित असलेले शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट चिडले होते. हे प्रोटोकॉलनुसार चुकीचं असल्याचे म्हणत खुर्चीवरून उठत कार्यक्रम सोडून शिरसाट निघाले होते. दरम्यान बाजूलाच बसलेले एम.आय.एम. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचा हात धरून रोखले आणि त्यानंतर शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला.