जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अखेर नाराज संजय शिरसाट यांनी विचार बदलला, मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला निघाले

अखेर नाराज संजय शिरसाट यांनी विचार बदलला, मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला निघाले

अखेर नाराज संजय शिरसाट यांनी विचार बदलला, मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला निघाले

या बातम्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास होईल म्हणून मी जातोय.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

औरंगाबाद, 06 सप्टेंबर : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळालेल्यामुळे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) कमालीचे नाराज झाले होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी सर्व आमदारांनी स्नेहभोजनासाठी बोलावले आहे. पण, शिरसाट येणार नसल्याची माहिती समोर आली होती. पण, आपण नाराज नसून मुंबईला निघालो असल्याचं, शिरसाट यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत असलेल्या आमदारांना वर्षा बंगल्यावर स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. पण, या स्नेहभोजनाला आमदार संजय शिरसाट हजर राहणार नसल्याचे वृत्त समोर आले होते. पण, आता शिरसाट यांनी याबद्दल खुलासा केला आहे. (‘ज्या गटाचे जास्त आमदार त्याचाच दसरा मेळावा, दानवेंनी शिवसेनेला डिवचले) ‘मतदारसंघात काम असल्याने मी आज मुंबईला जाऊ शकत नव्हतो. मात्र प्रसारमाध्यमांनी मी जाणार नाही अश्या बातम्या आल्या. त्यामुळे आता मी मुंबईला जाणार आहे. या बातम्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास होईल म्हणून मी जातोय. आज कसलीही बैठक नाही फक्त गणपती दर्शन आणि भोजन असा कार्यक्रम आहे, असा खुलासा शिरसाट यांनी केला. (Amravati RavI Rana : भोंग्यावरून राजकारण करणाऱ्या राणा दाम्पत्यांच्या गोडावूनमधून भोंग्यांचीच चोरी) मागील महिन्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने आपली नाराजी संजय शिरसाट यांनी बोलून दाखवली होती. तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कुटुंब प्रमुख म्हणून केलेल्या उल्लेखाचे ट्विटही चर्चेत आले होते. त्यानंतर  पुन्हा स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर त्यांनी छत्रपती संभाजीनगर उल्लेख न करता फक्त संभाजीनगर असा उल्लेख केला आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय अशा चर्चा औरंगाबादमध्ये रंगली होती. पण, आता सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या टप्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, या विस्तारामध्ये आपल्याला स्थान मिळाले, असं शिरसाट यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात