जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / PFI संघटनेभोवती फास आवळला, औरंगाबाद, नांदेडमध्ये ATS चे छापे, अनेक जण अटकेत

PFI संघटनेभोवती फास आवळला, औरंगाबाद, नांदेडमध्ये ATS चे छापे, अनेक जण अटकेत

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेविरोधात केंद्रीय तपास यंत्रणेनं मोठी मोहीम उघडली आहे.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

औरंगाबाद, 27 सप्टेंबर : वादग्रस्त संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाभोवती तपास यंत्रणा एनआयए आणि ईडीने फास आणखी आवळला आहे. औरंगाबाद, मालेगाव, नांदेड आणि सोलापूरमध्ये छापे टाकले आहे. पहाटेचं तपास यंत्रणेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेविरोधात केंद्रीय तपास यंत्रणेनं मोठी मोहीम उघडली आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये आज औरंगाबाद मध्येही ats ने छापे टाकले आहे. सोमवारी रात्री पासून अनेक ठिकाणी छापे टाकले आहे. काही संशियितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आज 13 ते 14 पीएफआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अजूनही शहरात एनआयए आणि एटीएस यांची संयुक्त कारवाई सुरू आहे. अजून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्या जाण्याची शक्यता आहे. (NIA चा PFI वर ‘सर्जिकल स्ट्राईक’, प्रकाश आंबेडकर म्हणतात पुरावे द्या, अन्यथा…) तर मुंबईजवळील PFI के चार सदस्यांना अटक करण्यात आली आहे. भिवंडी आणि मुंब्रा परिसरातील शीळ डायघर परिसरातून अटक केली आहे. (दाऊदचा साथीदार रियाझ भाटीला अखेर अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई) दरम्यान, PFI बाबत मोठी बातमी समोर आली आहे. PFI च्या रडारवर RSS आणि BJP चे अनेक मोठे नेते असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र ATS सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे PFI च्या निशाण्यावर नागपुरचा संघ मुख्यालयदेखील आहे. PFI च्या मोठ्या प्लानचा खुलासा PFI देशातील मोठे RSS आणि BJP नेत्यांवर हल्ला करण्याचा प्लान आखत होतो, अशीही माहिती सांगितली जात आहे. PFI च्या सदस्यांनी RSS ची दसऱ्याच्या दिवशी होणारी पथ संचालनाची माहिती जमा केली आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय एजन्सी NIA , CRPF आणि राज्य ATS ने संपूर्ण देशात 10 राज्यांमध्ये PFI शी संबंधित लोकांवर छापेमारी करीत शेकडो लोकांना अटक केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात