मुंबई, 27 सप्टेंबर : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार असलेल्या रियाझ भाटीला अटक करण्यात आली आहे. भाटी अंधेरी परिसरातून फरार होता. अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलने अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रियाझ भाटी आणि छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रूट याने अंधेरीतील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन महागडी कार आणि 7 लाखांहून अधिक रुपये उकळले होते. त्यानंतर या व्यावसायिकाने वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. त्याच्याविरुद्ध खंडणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि रियाझ भाटी याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने केला होता. अखेर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलने रियाज भाटीला अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.