मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

NIA चा PFI वर 'सर्जिकल स्ट्राईक', प्रकाश आंबेडकर म्हणतात पुरावे द्या, अन्यथा...

NIA चा PFI वर 'सर्जिकल स्ट्राईक', प्रकाश आंबेडकर म्हणतात पुरावे द्या, अन्यथा...

केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसने राज्यभरात पीएफआय संघटनांच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर छापेमारी केली. एनआयएच्या या कारवाईवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 22 सप्टेंबर : केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसने राज्यभरात पीएफआय संघटनांच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर छापेमारी केली. एनआयएने देशभरात 11 राज्यांमध्ये ही छापेमारी करत 100 जणांना ताब्यात घेतलं. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एनआयएने ही कारवाई केली आहे. एनआयएच्या या कारवाईवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या धाडी आपण का टाकल्या? आपल्याकडे यांच्याविरोधात काय होतं? आणि आपण जे कागदपत्र गोळा केलेले आहेत, त्यात किती निधी मिळाला? देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाले? हे या यंत्रणांनी येत्या 24 तासात लोकांसमोर मांडावं. असे आवाहन केंद्रीय तपास यंत्रणांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तपास यंत्रणांना 24 तासात हे मांडता आलं नाही, तर सामान्य माणूस हेच लक्षात घेईल की, भाजपचा जो मुस्लिम विरोधी अजेंडा आहे, तो पुढे करण्याकरिताच या धाडी टाकण्यात आल्या आहेत. असे असेल तर वंचित बहुजन आघाडी या धाडींचा निषेध करते. असेही त्यांनी म्हटले आहे. पीएफआयवर दिवसभर कारवाई वादग्रस्त संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आता तपास यंत्रणा एनआयए आणि ईडीच्या निशाण्यावर आली आहे. तब्बल 13 राज्यांमध्ये PFI च्या शंभरहून अधिक ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. महाराष्ट्रात मुंबईसह पुणे, मालेगावमध्ये ईडी आणि एएनआयने छापे टाकले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे. पीएफआय संदर्भात पुण्यात चार ठिकाणी छापेमारी सुरू आहे. पीएफआयचे नेते रझी अहमद खान यांच्या कोंढव्यातील घरावर कारवाई करण्यात आली. पीएफआयशी संबंधित गुन्ह्यांत एनआयए, जीएसटी, इडी आणि महाराष्ट्र एटीएस यांनी संयुक्त कारवाई केली. नवी मुंबईतील नेरूळच्या सेक्टर 23 मधील धारावे गावातही एनआयएनं धाड टाकली. एनआयएच्या टीमनं मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर रात्री 3 वाजता छापेमारी सुरू केली. तर दुसरीकडे मालेगावात ईडी, एएनआयनं छापा टाकला असून पीएफआय संघटनेच्या एका सदस्याला पहाटे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. सैफुरहेमान असं ताब्यात घेण्यात आलेल्याचं नाव आहे.
First published:

पुढील बातम्या