औरंगाबाद 28 नोव्हेंबर : शिंदे गटाचे आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. यानंतर अनेकांनी अब्दुल सत्तार यांना या मुद्द्यावरुन सुनावलं. आता पुन्हा एकदा सत्तार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या महिलेनं मला चोर म्हटलं तर कसं सहन करू? असा सवाल सत्तार यांनी उपस्थित केला आहे.
'उद्धव ठाकरेंवर टीका करून किती काळ राजकारण कराल'? संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल
सत्तार यावेळी बोलताना म्हणाले, की महिलांना विनंती आहे आमचा सन्मान ठेवा. आम्ही तुमचा सन्मान ठेवू. सुप्रियाताई कार्यकर्त्याला घरात घुसून मारीन असं म्हणतात, मी त्याचं राजकारण केलं का? असा सवाल त्यांनी केला. पुढे ते म्हणाले, की आम्ही माणसं आहोत आम्हाला परिवार आहे. त्यांच्यासमोर आम्हाला जाईल तिथं अपमानित केलं जात आहे. किती अपमान सहन करणार? मी महिलांचा आदर करतो. मात्र एखाद्या महिलेनं मला चोर म्हंटलं तर कसं सहन करणार. आम्हाला गद्दार म्हटलं जात आहे. पाठीत खंजीर मारला हे आरोप किती दिवस सहन करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सत्तार यांनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले, की उद्धव ठाकरे हे आताही लोक त्यांना का सोडून जात आहेत याचा विचार का करीत नाहीत? राज्यातील वातावरण मूठभर लोकांकडून बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय. आमचेही कार्यकर्ते अरेला कारे करू शकतात. याचे परिणाम राज्यात चांगले होणार नाहीत. जे चाललं आहे हे चांगले नाही, असं सत्तार म्हणाले.
'राज ठाकरेंनीच आपला मेंदू गहाण ठेवून...'; राहुल गांधींवरील टीकेला काँग्रेसचं सडेतोड प्रत्युत्तर
अब्दुल सत्तार म्हणाले, की आम्ही चांगले निर्णय घेतले. त्यामुळे पूर्णपणे सरकार चाललं आहे. पुढचे पाच वर्ष आम्हीच सरकारमध्ये आहोत. राज ठाकरे यांच्या भाषणाबद्दल बोलताना ते म्हणाले, की राज ठाकरेंनी राज्यातील नेत्यांचं जे काय चाललं आहे त्यावर प्रतिक्रिया दिली. मात्र त्यांनीच राहुल गांधींवर टीका केलीच. मी कुणाचा अपमान होणार नाही याची काळजी घेईल, अशी भावना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.