मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'उद्धव ठाकरेंवर टीका करून किती काळ राजकारण कराल'? संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल

'उद्धव ठाकरेंवर टीका करून किती काळ राजकारण कराल'? संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल

राज ठाकरे यांनी राहुल गांधींवर केलेल्या टिकेवर बोलताना राऊत म्हणाले, की राहुल गांधींनी भारत जोडोच्या निमित्ताने जे तीन महिने मेहनत करून दाखवलं ते टीका करणाऱ्यांनी चार दिवस करून दाखवावं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 28 नोव्हेंबर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन संजय राऊत यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पंतप्रधान असताना नेहरूंनीही माफी मागितली होती जेव्हा त्यांच्याकडून शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं लिखाण झालं होतं. मात्र, भाजपचे हे जे टगे आहेत ते शिवरायांचा अपमान करून महाराष्ट्राला शहाणपण शिकवत आहेत. हे महाराष्ट्र बघतो आहे. महाराष्ट्र संतापला आहे. त्याचा उद्रेक झाल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

'राज ठाकरेंनीच आपला मेंदू गहाण ठेवून...'; राहुल गांधींवरील टीकेला काँग्रेसचं सडेतोड प्रत्युत्तर

राऊत पुढे म्हणाले. छत्रपतींचा आमच्या आराध्य दैवताचा अपमान भाजपचे आराध्य दैवत म्हणजे कोश्यारी आणि त्यांचे प्रवक्ते करत आहेत. त्यांना वाटतं की आम्ही विसरून जाऊ, मात्र विरोधी पक्ष एकत्र आलाय. ॲक्शन प्लान तयार आहे. आम्ही वाट पहात आहोत की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे स्वाभिमानाच्या गप्पा करतात. ते हात चोळत, तोंड शिवून किती दिवस गप्प बसणार आहेत. आम्ही महाराष्ट्राला दाखवत आहोत की हा त्यांचा स्वाभिमान, अभिमान आहे. याच लोकांनी शिवसेना फोडली कारण शिवसेनेवर महाराष्ट्राचा अभिमान आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, की राजनिती म्हणजे मिमीक्री नव्हे. आम्हाला मिमीक्री बघायची असे तर ओरीजनल पाहू.. जॅानी लिव्हरची पाहू.. राजू श्रीवास्तवची पाहू. हे नाटक मिमीक्री खूप झाल्या. यांच्या पलिकडे आपण मॅच्युअर झाला आहात, महाराष्ट्र पाहा. उद्धव ठाकरेंवर टीका करून किती काळ राजकारण कराल? मी सर्वांना सांगतो. काही विधायक काम करा, असा टोला त्यांनी लगावला.

'..तर मी क्षमा मागतो'; महिलांबाबतच्या त्या विधानानंतर बाबा रामदेव यांनी मागितली माफी

पुढे ते म्हणाले, की जे टीका करतात त्यांनी बुलडाण्याची सभा बघायला हवी होती. त्यातलं भाषण ऐकायला हवं होतं. पूर्ण बुलडाणा लोटला होता उद्धव ठाकरेंचं स्वागत करायला. राज ठाकरे यांनी राहुल गांधींवर केलेल्या टिकेवर बोलताना राऊत म्हणाले, की राहुल गांधींनी भारत जोडोच्या निमित्ताने जे तीन महिने मेहनत करून दाखवलं ते टीका करणाऱ्यांनी चार दिवस करून दाखवावं.

First published:

Tags: Governor bhagat singh, Sanjay raut