Home /News /maharashtra /

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार क्रूझवर होते?, NCB नं दिलं उत्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार क्रूझवर होते?, NCB नं दिलं उत्तर

नवाब मलिकांच्या आरोपावर एनसीबीनं स्पष्टीकरण देत सर्व आरोप बिनबुडाचं असल्याचं म्हटलं.

    मुंबई, 10 ऑक्टोबर: 2 ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर एनसीबीनं (NCB) केलेल्या कारवाईवर आणि आर्यन खान अटक (aryan khan arrest case) प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी एनसीबीवर (ncb) गंभीर आरोप केले. पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी एनसीबीनं 11 जणांना ताब्यात घेतलं होतं मात्र त्यातल्या तीन जणांना सोडून दिल्याचा आरोप करण्यात आला. त्यात सोडून दिलेल्यांमध्ये एक जण भाजप नेते मोहित भारती यांचा मेहुणा ऋषभ सचदेवा याला असल्याचा आरोपही त्यांनी केला. नवाब मलिकांच्या आरोपावर एनसीबीनं स्पष्टीकरण देत सर्व आरोप बिनबुडाचं असल्याचं म्हटलं.. एनसीबीनंही काल पत्रकार परिषद घेऊन मलिकांचे आरोप फेटाळले आहेत. यावेळी एनसीबीच्या पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारही या क्रूझवर होते का ? असा प्रश्न विचारला गेला. त्यावर एनसीबी मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं. यावर उत्तर देताना वानखेडे म्हणाले की, तुम्ही जी नावं विचारत आहात त्यावर एकच बोलू शकेन की या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यामुळे नावं सांगणं योग्य ठरणार नाही. आम्ही फार जबाबदार संस्थेसाठी काम करतो. आम्ही असं कोणतंही वक्तव्य करु शकणार नाही. आम्ही फक्त पुरव्यांच्या आधारे बोलतो. हेही वाचा- पुण्यातील पावसाचा फटका थेट पालकमंत्री अजितदादांनाच ! मलिकांच्या आरोपावर NCB चं स्पष्टीकरण एकूण 14 जणांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन आणलं गेलं. यापैकी 6 जणांना पुराव्या अभावी सोडून देण्यात आले, असं एनसीबीनं मलिकांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे. तसंच सोडण्यात आलेल्या 6 जणांची नावे देता येणार नाही असं सांगत प्रकरण कोर्टात सुरु आहे, अशी माहिती एनसीबीनं दिली आहे. 1 तारखेच्या कारवाई नंतर 6 ठिकाणी छापे टाकले गेले. या कारवाईत 10 जणांना अटक केली. एनसीबीचे काम निष्पक्ष केले जाते, असं म्हटलं आहे. हेही वाचा-  पुण्यात पावसाचं धूमशान; रस्ते जलमय झाल्याने वाहतूक विस्कळीत, घरांमध्येही शिरलं पाणी, पाहा VIDEO NCB भारतातून अंमली पदार्थ हद्दपार करत असल्याचं एनसीबीनं म्हटलं आहे. तसंच मुंबई NCB टीम ने मोठी कारवाई केलीय. क्रुझ पार्टीवर आम्ही कारवाई केली. यांत 8 जणांना अटक करण्यात आली. 9 साक्षीदार होते. अटक करण्यात आलेल्या लोकांना NCB कधीच ओळखत नव्हती. 2 तारखे आधी म्हणजेच कारवाई आधी या साक्षीदारांना कधीच ओळखत नव्हती, असं एनसीबीनं स्पष्टपणे सांगितलं आहे.तसंच आरोपींना घेऊन जाण्यास मनिष भानूशाली यांना कोणीही आदेश दिले नव्हते, असंही एनसीबीनं स्पष्ट केलं आहे. कॅमेऱ्याची गर्दी होती म्हणून त्यांनी आरोपींना नेले असं त्यांनी आम्हाला सांगितलं, अशी माहिती एनसीबीनं पत्रकार परिषदेत दिली आहे. सगळ्या प्रक्रिया कायदेशीर रित्या पार पाडल्या गेल्या. तपासात आढळलेल्या पुराव्यांमुळे न्यायालयाने आरोपींना NCB कोठडी सुनावली होती. विविध प्रकारचे अंमली पदार्थ सापडले होते. NCB वर लावण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचंही एनसीबीनं म्हटलं आहे. कारवाई दरम्यान तात्काळ साक्षीदार तयार करावे लागतात, अशी माहितीही एनसीबीनं दिली आहे. हेही वाचा-  12000 रुपयांपर्यंतच्या स्मार्टफोनवर मिळेल 6000 रुपये Cashback, Airtel ची भन्नाट स्किम किरण गोसावी यानं जे सांगितलं तेच आम्ही नोंदवलं. NCB जात धर्म आणि भाषेनुसार काम करत नाही. आम्ही पुराव्या आधारावर बोलतो, असंही म्हटलं आहे. आम्हाला जे काही बोलायचे ते कोर्टात बोलणार असल्याचंही एनसीबीनं स्पष्टपणे सांगितलं आहे. नवाब मलिकांचे आरोप एनसीबीनं 8 लोकांना ताब्यात घेतलं असं सांगितलं होतं. पण एनसीबीनं 11 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिघांना सोडण्यात आलं. त्यात रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा, अमीर फर्निचरवाला या तिघांना सोडून देण्यात आलं. रिषभ सचदेवा यांचा भाजप नेत्यांशी संबंध असल्याचा खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे. रिषभ सचदेवा, हे भाजप युवा मोर्चाचे मोहित भारती यांचा मेहुणा आहे. रिषभ सचदेवा हे राष्ट्रपतींना पण भेटले आहेत, आणि राष्ट्रपती यांनी पुरस्कृत केलं आहे. रिषभ सचदेवा यांना 2 तासात सोडण्यात आलं. जेव्हा सुनावणी सुरू होती तेव्हा यांचं नाव reflect झालं होतं. यांच्याच बोलण्यावरून आर्यन आला होता, असा खुलासाही मलिकांनी केला. या 3 लोकांना सोडण्याचे आदेश कुणी दिले हे ncb ला सांगावं लागेल, असा सवाल मलिकांनी एनसीबीला विचारलं आहे. आम्ही मागणी करयोय की वानखेडे यांनी याचा तात्काळ खुलासा करावा, असं मलिक म्हणालेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Ajit pawar, NCB, NCP

    पुढील बातम्या