पुणे, 10 ऑक्टोबर: पुणे शहराला (Pune City) पुन्हा एकदा मुसळधार (Heavy Rainfall) पावसानं झोडपून काढलं आहे. शनिवारी संध्याकाळनंतर ढगांच्या गडगडाटासह झालेल्या जोरदार पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली. लोहगाव परिसरात शनिवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसाचा फटका थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाच बसला. रात्री साडे आठ वाजता लोहगाव विमानतळावरून भोसलेनगर येथील निवासस्थानाकडे निघालेले अजित पवार गेल्या एका तासाहून वाहतूक कोंडीत अडकले. अजित पवार औरंगाबाद दौरा आटोपून पुण्यात आले होते. पुण्यात आल्यानंतर पवार यांचा ताफा नवीन विमानतळ रस्त्याने पाठवण्यात आला. मात्र, पुणे- नगर महामार्गावर शास्त्री चौकात झालेल्या वाहतूक कोंडीत त्यांचा ताफा अडकला.
पुण्यात पावसाचा तडाखा pic.twitter.com/IYb5qUWRGK
— News18Lokmat (@News18lokmat) October 10, 2021
संध्याकाळी सहाच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा आणि नगररोड पावसाने चांगलेच झोडपले. मुसळधार पावसाने रस्त्यांना नाल्याचं रूप आलं. यामुळे या भागातील नगर रस्त्यासह विमानतळ, लोहगाव धानोरी या रस्तावरील वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीत उपमुख्यमंत्री पवारही अडकले होते.
येरवडा, विमाननगर, धानोरी परिसरात पावसाचा सर्वाधिक जोर pic.twitter.com/nvYje0npEs
— News18Lokmat (@News18lokmat) October 10, 2021
अवघ्या तासा-दीड तासाच्या जोरदार पावसामुळे रात्री साडे आठपर्यंत 49.2 मिमी पावसाची नोंद वेधशाळेत करण्यात आली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. धानोरीत रस्त्यांना नद्यांचं स्वरुप धानोरीतील डोंगरालगत असलेल्या परिसरात डोंगरावरील पाणी वाहून आलं. त्यामुळे धानोरीतील रस्त्यांना नदीचे स्वरूप आलेलं पाहायला मिळालं. यामुळे रस्त्यावर असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनं पावसाच्या पाण्यात तरंगत होते.
हेही वाचा- Lakhimpur kheri Violence : 12 तासाच्या चौकशीनंतर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राला अटक
विमाननगर, धानोरी, येरवडा, नागपूर चाळ, विश्रांतवाडी परिसरात सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरलं. मुसळधार पावसाने पुण्यात विश्रांतवाडी धानोरी भागात घरांमध्ये दुकानात पाणी शिरलं होतं. रस्त्यावर आलेल्या पाण्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याने अनेक जन गाड्यांमध्ये अडकले होते. येरवडा, धानोरी, नगर रस्ता, कात्रज, धनकवडी, आंबेगाव, सिंहगड रस्ता अशा भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. कसबा पेठ परिसरातही जोराचा पाऊस झाला. शनिवारी सुमारे तीन ते चार तास पाऊस पडत झाल्यानं पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडाली. वाकडेवाडी, ताडीवाला रोड, वाडिया कॉलेज, येरवडा येथे झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या.