आजकाल कोणत्याही प्रकारचं व्यसन (Addiction) करणं फॅशन समजलं जातं. दारू, बीअर किंवा अगदी अमली पदार्थ अशा कोणत्याही गोष्टीचं व्यसन आरोग्यासाठी (Health) नुकसानकारक समजलं जातं. यामुळे संबंधित व्यक्तीचं आर्थिक, सामाजिकदृष्ट्यादेखील नुकसान होतं. हे सर्व माहिती असूनदेखील अनेकजण व्यसनाच्या आहारी जातात. तुम्ही आतापर्यंत दारू, बीअर, तंबाखू, सिगारेट, विविध अंमली पदार्थ आदींच्या व्यसनांविषयी ऐकलं, वाचलं असेल; पण अमेरिकेतली एक महिला अशी आहे, की जिला यापेक्षा काहीसं निराळं आणि किळसवाणं व्यसन लागलं आहे. ही महिला अमेरिकेतली (America) असून, तिला स्वतःची युरीन (Urine) अर्थात स्वमूत्र पिण्याचं आगळंवेगळं व्यसन लागलं आहे. असं केल्यावर दारू प्यायल्यासारखं वाटत असल्याचा दावा या महिलेनं केला आहे. याविषयीचं वृत्त `आज तक`ने दिलं आहे.
अमेरिकेतल्या 53 वर्षांच्या कॅरी (Carrie) यांना एक भलतंच व्यसन लागलं आहे. त्यांना स्वतःचं मूत्र पिणं फार आवडतं. गेल्या चार वर्षांपासून त्या हे व्यसन करत आहेत. "स्वमूत्र पिणं हे माझं व्यसन बनलं असून, मला तिचा स्वाद शॅम्पेनसारखा वाटतो", असं कॅरी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : पतीच्या सुटकेसाठी सात दिवस जंगलात भटकली, अखेर माओवाद्यांना माणुसकीचा पाझर फुटला
चार वर्षांपूर्वी कॅरी यांना मेलॅनोमा कॅन्सरचं (Melanoma Cancer) निदान झालं. कॅन्सर झाल्याचं समजातच कॅरी यांनी केमोथेरपी (Chemotherapy) घेण्याऐवजी स्वमूत्राच्या माध्यमातून उपचार सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कॅरी यांनी स्वमूत्र पिणं सुरू केलं. कॅरी यांच्या मुलीला या व्यसनाची माहिती मिळताच तिने कॅरी यांना डॉक्टरांकडे नेलं; पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. तसंच वारंवार सांगूनही कॅरी यांनी मुलीचं ऐकण्यास नकार दिला. "मी टूथपेस्टऐवजी स्वमूत्राचा वापर तोंड धुण्यासाठी करते. स्वमूत्र पिणं सोडलं तर मी जिवंत राहू शकणार नाही", असं कॅरी सांगतात.
'द सन'च्या वृत्तानुसार, कोलोरॅडो (Colorado) येथे राहणाऱ्या कॅरी या गेल्या चार वर्षांपासून हे विचित्र व्यसन लागलं आहे. पाणी पिण्यापेक्षा स्वमूत्र पिणं अधिक सोपं असल्याचं कॅरी यांनी सांगितलं. त्या दिवसातून किमान 5 ग्लास स्वमूत्र पितात. या प्रमाणे हिशोब केल्यास चार वर्षात त्यांनी सुमारे 3406 लिटर एवढं स्वमूत्र प्यायलं आहे.
हेही वाचा : हतबल पोलिसावर पोटच्या लेकाला विकण्याची वेळ
'टीएसएल'च्या माय स्ट्रेंज अॅडिक्शनवर बोलताना कॅरी यांनी सांगितलं, की "मला गरम स्वमूत्र अधिक आवडतं. यामुळे मला समाधान मिळतं. मी जे काही खाते, त्याचा गंध माझ्या मूत्राला येतो. चार वर्षांच्या तुलनेत आता मूत्राची चव काहीशी बदलली आहे. काही वेळा मूत्राची चव काहीशी तिखट असते, तर काही वेळी ही चव शॅम्पेनसारखी असते."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.