जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ‘डिलिव्हरी बॉय’ला ती नेहमी फसवते, तयार करते अनोखा आभास

‘डिलिव्हरी बॉय’ला ती नेहमी फसवते, तयार करते अनोखा आभास

‘डिलिव्हरी बॉय’ला ती नेहमी फसवते, तयार करते अनोखा आभास

आपल्या सुरक्षेसाठी आपल्या घरात बॉयफ्रेंड (Woman pretend to have boyfriend when delivery boy comes to home) असल्याचा आभास निर्माण करणाऱ्या महिलेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

आपल्या सुरक्षेसाठी आपल्या घरात बॉयफ्रेंड (Woman pretend to have boyfriend when delivery boy comes to home) असल्याचा आभास निर्माण करणाऱ्या महिलेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. घरात एकट्या राहणाऱ्या महिलांना अनेकदा त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटते. काही (Various methods of self-defense) महिला जवळ शस्त्र बाळगतात, काही पेपर स्प्रे बाळगतात तर काहीजणी अनोळखी व्यक्तीसाठी दारच उघडत नाहीत. मात्र कॅनडामध्ये राहणाऱ्या एका मॉडेलनं स्वतःच्या सुरक्षेसाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. मॉडेलची आयडिया कॅनडात राहणारी मॉडेल सिल्केन शू ही स्वतःच्या सुरक्षेसाठी वेगळाच उपाय करते. तिनं नुकत्याच रिलीज केलेल्या टिकटॉक व्हिडिओमध्ये ही बाब शेअर केली आहे. ज्यावेळ डिलिव्हरी बॉय वस्तू देण्यासाठी दारात येतो, तेव्हा ती घरात तिचा बॉयफ्रेंड असल्याचं भासवते. त्यासाठी पुरुषांचे काही कपडे ती पसरून ठेवते. येणाऱ्या प्रत्येकाला ते दिसतील आणि तिचा बॉयफ्रेंड घरातच असल्याचा भास निर्माण होईल, असं वातावरण ती तयार करते. एवढंच नव्हे, तर त्याच्या शेजारी बॉक्सिंग ग्लव्ह्ज देखील ठेवलेले असतात. बॉयफ्रेंड नसूनही होतो खर्च प्रत्यक्ष बॉयफ्रेंड नसूनही केवळ तो आहे याचा आभास निर्माण करण्यासाठीदेखील आपला खूप खर्च होत असल्याचं ती सांगते. पुरुषांचे कपडे, शूज, बॉक्सिंग ग्लव्ह्ज, स्केटबोर्ड, मेल हुडी अशा अनेक वस्तूंवर तिने पैसै खर्च केले आहेत. त्यासोबत ती तिच्या आयपॅडवर एक साउंड ट्रॅकदेखील लावून ठेवते. त्यात ऐकणाऱ्याला पलिकडून कुणीतरी बोलत असल्याचा आभास निर्माण होतो. घरात आपल्याव्यतिरिक्त कुणीतर आहे, याचा आभास निर्माण केल्यामुळे डिलिव्हरी बॉय किंवा इतर कुणीही व्यक्ती आपल्यावर हल्ला करणार नाही, असं तिला वाटतं. हे वाचा-  दिल्लीत श्वास घेणं मुश्कील! पूर्वीच स्टीफन हॉकिंग यांनी केलं होतं भाकित व्हिडिओ होतोय व्हायरल टिकटॉकवरचा तिचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून 25 लाख लोकांनी तो पाहिला आहे. काहींनी त्यावर आपले अनुभवदेखील शेअर केले आहेत. आपणदेखील डिलिव्हरी बॉय आल्यानंतर आपल्या पतीसोबत किंवा बॉयफ्रेंडसोबत बोलत असल्याचं नाटक करतो, असे अनुभव काही महिलांनी शेअर केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: security , woman
  • First Published :
जाहिरात
जाहिरात