मराठी बातम्या /बातम्या /देश /

राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, बॅरिकेड्स तोडत आतमध्ये घुसली कार

राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, बॅरिकेड्स तोडत आतमध्ये घुसली कार

भरधाव वेगात आलेली (Big laps in security of Rashtrapati Bhavan as drunken youth rams car inside) कार राष्ट्रपती भवनाचे सुरक्षा बॅरिकेड्स तोडून आत घुसल्यामुळे तिथल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: भरधाव वेगात आलेली (Big laps in security of Rashtrapati Bhavan as drunken youth rams car inside) कार राष्ट्रपती भवनाचे सुरक्षा बॅरिकेड्स तोडून आत घुसल्यामुळे तिथल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सोमवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमाराला राष्ट्रपती भवनाच्या दिशेनं आलेली एक (Car broke barricades and went inside) कार थेट बॅरिकेड्स तोडून आतमध्ये घुसली आणि सुरक्षा व्यवस्था सतर्क झाली.

अशी घडली घटना

दिल्लीत राष्ट्रपती भवनच्या दिशेनं एक भरधाव कार येताना सुरक्षा रक्षकांनी पाहिलं. मात्र ते काही हालचाल करण्याच्या आतच ही कार सुरक्षा बॅरिकेड्स तोडून आतमध्ये घुसली. कारचा वेग तुफान असल्यामुळे गेटवर उपस्थित कर्मचाऱ्यांना काहीच करता आलं नाही. मात्र कार आतमध्ये घुसल्याचं समजताच बाहेरील सुरक्षारक्षकांनी आतील कर्मचाऱ्यांना सतर्क केलं आणि कार थांबवण्याची सूचना केली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी ही कार थांववत ती चालवणारा तरूण आणि त्याच्यासोबत बसलेल्या त्याच्या मैत्रिणीला अटक केली.

दारुच्या नशेत कृत्य

दिल्लीतील संगम विहार परिसरात राहणारा शिवम नावाचा तरुण आणि आणि उत्तराखंडमधील त्याची मैत्रीण यांना दुसऱ्या दिवशी कोर्टात सादर करण्यात आलं. कोर्टानं त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. तरुण गाडी चालवताना दारूच्या नशेत असल्याचं दिसून आलं आहे. दारुच्या नशेत स्वतःवरील ताबा सुटल्यामुळे वेगाने कार चालवत त्याने ती राष्ट्रपती भवनाच्या गेटपासूनह आतमध्ये नेली.

हे वाचा- दिल्लीत श्वास घेणं मुश्कील! पूर्वीच स्टीफन हॉकिंग यांनी केलं होतं भाकित

सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

राष्ट्रपती भवनासारख्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणाच्या सुरक्षेबाबत यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एखादा तरुण जर दारू पिऊन कार वेगाने चालवत थेट ती राष्ट्रपती भवनाच्या गेटच्या आतपर्यंत नेऊ शकत असेल, तर तिथली सुरक्षा पुरेशी सतर्क आणि सक्षम नसल्याची चर्चा आहे. याबाबत तातडीने सुधारणा करून सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस या प्रकाराचा अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Delhi, President, Security