मुंबई, 17 ऑक्टोबर : अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपने उमेदवार मागे घेतला. भाजपने घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक होत आहे. ऋतुजा लटके या रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक होऊ नये म्हणून राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. तसंच शरद पवारांनीही पत्रकार परिषद घेऊन भाजपने उमेदवार मागे घ्यावा, अशी भावना व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही ऋतुजा लटकेंना बिनविरोध विधानसभेवर पाठवण्यात यावं, अशी प्रतिक्रिया दिली. जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या या मागणीनंतर भाजपने त्यांचा उमेदवार मागे घेतला. भाजपच्या या भूमिकेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे तसंच शरद पवारांनी स्वागत केलं, पण अजूनही उद्धव ठाकरे यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शरद पवारांनी रविवारी पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचं कौतुक केलं. शरद पवार ज्येष्ठ नेत असून त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा दाखवला. शिवसेना कुटुंब त्यांच्या बद्दल सदैव आभारी राहील, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. काल पवारांच्या भूमिकेचं स्वागत करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आता आपला एक आमदार वाढत असतानाही कोणतीही प्रतिक्रिया का दिली नाही? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. राजची साद, पण ‘क्रेडिट’ पवारांना, अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी उद्धव ठाकरेंचं पुढचं पाऊल ठाकरेंच्या नेत्यांकडून टीका, पवारांची नाराजी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने माघार घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेत्यांकडून भाजपवर टीका केली. पराभव दिसत असल्यामुळे भाजपने उमेदवार मागे घेतल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते म्हणाले. ठाकरेंच्या या नेत्यांच्या वक्तव्यांबाबत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. माघार घेतल्यानंतर त्यावर शंका किंवा इतर काही बोलणं योग्य नाही, असं म्हणत पवारांनी भाजपच्या निर्णयाचं स्वागत केलं. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपची माघार, ‘ज्येष्ठ’ पवारांनी टोचले ठाकरेंच्या शिलेदारांचे कान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.